नवी मुंबई : कोरोना महामारीच्या काळात (Corona) रुग्णालयांमधील ढिसाळ कारभारामुळे (Hospitals Sloppy management) अनेक अडचणींना सामान्यांना सामोरं जावं लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यावेळी रुग्णालयांमध्ये खाटा मिळण्यांपासून ते तेथील खर्च अशा अनेक गोष्टींमुळे रुग्णालयांतील व्यवस्थापनासंबधी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. दरम्यान यामुळे आता रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने (Panvel Municipal Corporation) याविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. त्यांनी दरपत्रक नसलेल्या तब्बल 240 रुग्णालयांना नोटीस पाठवली (Notice Sent to 240 hospitals) आहे.
कोरोना काळात सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करण्यात आली होती. अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. ज्यामुळे रुग्णालयांमधील व्यवस्थापनावरही अनेक प्रश्न उठवण्यात आले होते. त्यामुळे शासनाने महानगर पालिकांकडून रुग्णालयांत कोरोनावरील उपचारांसह इतर उपचारांचे दरपत्रक लावून घेतले जात आहे. मात्र काही रुग्णालयांमध्ये विविध आजारावरील उपचार करण्यासाठी दरपत्रक लावण्यात आले नसल्याचेही समोर आले. ज्यानंतर ही बाब पनवेल (Panvel) महानगर पालिका आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत पनवेल आरोग्य विभागाकडून संबधित रुग्णालयाच्या दर्शनी भागात उपचारांचे दरपत्रक लावण्यात याव्यात अशी सूचना दिली आहे. त्यांनी याबाबतच्या नोटीसा रुग्णालयांना (Hospitals) पाठवल्या आहेत.
संबंधित बातम्या :
- Omicron : तिसरी लाट आली तर ओमायक्रॉनचीच, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा
- Omicron : राज्यात आज ओमायक्रॉनच्या 11 नव्या रुग्णांची भर, आतापर्यंत 65 रुग्णांची नोंद
- South Africa Tournament : दक्षिण आफ्रिकेची 'ही' स्पर्धा कोरोनामुळे रद्द , टीम इंडियाच्या दौऱ्यादरम्यान मोठा निर्णय
- World Migration Report: कोरोना काळात 28 कोटी आंतरराष्ट्रीय स्थलांतर, भारतीय आघाडीवर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha