Cricket South Africa cancelled MSL : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. 26 डिसेंबरपासून दोन्ही देशांदरम्यान, तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉनच्या (Omicron) सावटामुळे यातील पहिला सामना प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय काल दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने (Cricket South Africa)  घेतला आहे. दरम्यान, आफ्रिका बोर्डाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात होणारी फ्रँचायझी लीग MSL (Cricket South Africa cancelled MSL ) ही स्पर्धा रद्द केली आहे. बोर्डाने हा निर्णय 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणाऱ्या कसोटी मालिकेआधीच घेतला आहे. 


दरम्यान, या मालिकेवर अद्याप कोरोनाचे  (Corona Virus)  संकट नाही. परंतु, ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे दक्षिण आफ्रिका बोर्डाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. 


फ्रँचायझी लीग MSL ही दक्षिण आफ्रिकेत देशांतर्गत खेळण्यात येणारी स्पर्धा आहे. भारतात होणाऱ्या आयपीएलसारखी ही स्पर्धा असून यात बाहेरील देशातील खेळाडू सहभागी होतात. परंतु, सध्या ओमायक्रॉनच्या सावटामुळे दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवासावर अनेक देशांनी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आफ्रिका बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. 


26 डिसेंबरपासून भारत दक्षिण आफ्रिका कसोटी सामना
ओमायक्रॉनच्या सावटाखालीच भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांची एक कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. यातील पहिला सामना 26 डिसेंबरपासून सेंचुरियन येथे खेळण्यात येणार आहे. भारतीय संघ सध्या सेंचुरियन येथीलच एका गेस्ट हाऊसवर मुक्कामी आहे. येथील सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. गेस्ट हाऊसवर टीम इंडियासोबत त्यांचा परिवारही आहे. 


महत्वाच्या बातम्या