मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक नाही
Mega Block : लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे.
Mumbai Local Mega Block : लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. रविवारी उप नगरीय रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या रविवारी (29 जानेवारी 2023) मेगाब्लॉक नाही. त्यामुळे विकेंडला बाहेर जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही पण मध्य रेल्वेच्या खडावली ते आसनगांव दरम्यान शनिवारी/रविवारी रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी काही उपनगरीय लोकल सेवा आणि लांब पल्याचा मेल-एक्सप्रेस गाड्यांचा वेळापत्रकावर मोठा परिणाम पडणार आहे.
खडवली - आसनगाव विभागातील विशेषकालीन रात्रीचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक -
मध्य रेल्वे शनिवारी मध्यरात्री 02.05 ते 04.05 या वेळेत खडवली आणि आसनगाव दरम्यान अप आणि डाउन मार्गांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलासंदर्भात रात्रीचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे ट्रेन धावण्याचा पॅटर्न खालीलप्रमाणे असेल:
उपनगरीय गाड्या -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00.15 वाजता कसारा करीता सुटणारी लोकल ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
कसारा येथून 03.15 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी लोकल ठाणे येथून चालविण्यात येईल.
खालील लांब पल्ल्याच्या गाड्या आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा येथे 35 मिनिटे ते 95 मिनिटांपर्यंत नियमित केल्या जातील आणि वेळेपेक्षा उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
ट्रेन क्रमांक 20104 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 18030 शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
गाडी क्रमांक 12810 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल नागपूर मार्गे
ट्रेन क्रमांक 12152 शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता एक्सप्रेस.
ट्रेन क्रमांक 11402 आदिलाबाद - मुंबई एक्सप्रेस
मुंबई - सिकंदराबाद एकमार्गी विशेष ट्रेन -
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते सिकंदराबाद एकमार्गी विशेष गाड्यात चालविण्यात येणार आहेत.
01485 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून शनिवारी सकाळी 00.20 वाजता सुटेल आणि सिकंदराबाद येथे त्याच दिवशी 18.30 वाजता पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा, हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, धर्माबाद, निजामाबाद, बोलारुम.
संरचना: एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, 5 तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ जनरेटर व्हॅन.
आरक्षण: 01485 साठी विशेष शुल्कासह बुकिंग शनिवारी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या वेळेच्या तपशीलासाठी कृपया enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.