एक्स्प्लोर

बेस्ट संपाचा फायदा एनएमएमटीला, उत्पन्न वाढलं

गेल्या आठ दिवसांच्या बंदच्या काळात परिवहन सेवेला या मार्गांवर रोज सहा लाखांचा फायदा झाला आहे. या बद्दलची माहिती नवी मुंबई परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.

नवी मुंबई : गेले 9 दिवस चालेल्या बेस्टचा संपामुळे नवी मुंबई परिहवन सेवेला चांगलाच फायदा झालाय. बेस्ट संप काळात नवी मुंबई परिवहन उपक्रमाने मुंबईच्या 14 मार्गांवर फेऱ्या वाढविल्या आहेत यामुळे रोज सहा लाखांपर्यंत फायदा होत आहे. नवी मुंबई परिवहन विभागाच्या 114 बसेस रोज साडेतीनशे फेऱ्या करतात. मात्र बेस्ट बंदच्या पार्श्वभूमीवर 40 जादा बसेस चालवण्यात आल्या. तर साडेतीनशे फेऱ्यांमध्ये 115 फेऱ्यांची वाढ केली आहे. गेल्या आठ दिवसांच्या बंदच्या काळात परिवहन सेवेला या मार्गांवर रोज सहा लाखांचा फायदा झाला आहे. या बद्दलची माहिती नवी मुंबई परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता बेस्टचं चुकतंय कुठं? हाच प्रश्न सर्व मुंबईकरांना पडला आहे. मुंबईसह इतर शहरांमधील सार्वजनिक बस वाहतूक सेवाही धोक्यात आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांमधल्या सार्वजनिक बस सेवा तग धरुन आहेत. इतर शहरांमधल्या बसेस या महापालिका, खाजगीकरण, राज्य सरकारचे अनुदान यांच्या आधारावर उभ्या आहेत. परंतु बेस्टला उभं राहायला सध्या महापालिका किंवा राज्य सरकारचा कोणताच टेकू उपलब्ध नाही. त्यामुळे बेस्टची वाताहत होत आहे. मुंबईतील बेस्टची स्थिती  1. बेस्टच्या डोक्यावर सध्या अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे 2. बेस्टला महिन्याला सुमारे 200 कोटी रुपयांचा तोटा होतो. 3. दर महिन्याला कर्मचाऱ्यांचे पगार भागवण्यासाठी कर्ज काढावे लागते. 4. परिवहन विभागाचे एका दिवसाचे उत्पन्न 3 कोटी तर खर्च 6 कोटी रुपये इतका आहे. 5. 2018-19 या आर्थिक वर्षात 769 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प, 6. बेस्टला वीजचोरी आणि वीजगळतीमुळे 200 कोटींचा तोटा होत आहे. 7. बेस्टला पर्याय असणाऱ्या मेट्रो, ओला-उबेरसारख्या जलदगती वाहतूक सुविधांमुळे बेस्टची प्रवासी संख्या घटली. संबंधित बातम्या बेस्टचा संप अखेर मागे, शशांक राव यांची घोषणा, कामगारांच्या पगारात 7 हजार रुपयांची वाढ टीएमटी,केडीएमटी,पीएमटी सुरळीत, मग बेस्टचं काय चुकतंय? बेस्ट संप : आठवडाभरात काय काय झालं?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोपSpecial Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?Zero Horu Washington : हिमवादळानं वॉशिग्टनमध्ये वाहतूक मंदावली, परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget