एक्स्प्लोर

सचिन वाझेच्या नजरकैद अर्जाला NIA चा विरोध; घरातून फरार होण्याची व्यक्त केली भीती

Sachin Vaze Case : शस्त्रक्रियेनंतर नजरकैदेत घरीच नजर कैदेत ठेवण्यात यावं म्हणून सचिन वाझेनं कोर्टात अर्ज केला होता. पण NIA नं या अर्जाला जोरदार विरोध केला आहे.

Sachin Vaze Case : मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या बडतर्फ सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेनं ह्रदयावर शस्त्रक्रिया (ओपन हार्ट) झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत घरातच नजर कैदेत ठेण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज केला आहे. मात्र या अर्जाला सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)नं जोरदार विरोध केला. सचिन वाझेला घरात नजरकैदेत ठेवल्यास तो फरार होऊ शकतो, असा दावा एनआयएकडून करण्यात आला.

अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. तळोजा कारागृहात असलेल्या वाझेला ह्रदयाचा त्रास असल्यानं 30 ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाल्यानं मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुणालयात त्याच्यावर 14 सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर वाझेनं विशेष सत्र न्यायालयात वकिलांमार्फत अर्ज दाखल केला असून शस्त्रक्रिया झाल्यापासून पूर्णपणे बरे होईपर्यंत आपल्याला घरातच नजरकैदेत ठेवावं, अशी विनंती अर्जातून करण्यात आली आहे. त्याची दखल घेत न्यायालयानं एनआयएला त्यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार सोमवारी विशेष न्यायायलयात न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, एनआयएनं वाझेच्या अर्जाला विरोध केला. वाझेला घरातच नजर कैदेत ठेवल्यास तो फरार होण्याची शक्यताही बोलून दाखवली. तसेच तळोजा कारागृहात त्याच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी सर्व आधुनिक सुविधांची सोय करण्यात आल्याची माहितीही एनआयएच्यावतीनं देण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालयानं वाझेचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला देत सुनावणी 29 सप्टेंबरपर्यत तहकूब केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sachin Waze : शस्त्रक्रियेनंतर बरं वाटेपर्यंत घरीच नजरकैदेत ठेवा; सचिन वाझेचा न्यायालयात अर्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Embed widget