एक्स्प्लोर
परळ स्टेशन लवकरच होणार टर्मिनस, रेल्वेकडून अधिकृत घोषणा

मुंबई: मुंबईतल्या मध्ये रेल्वेवरील गर्दीचं आणि पश्चिम रेल्वेशी जोडल्या गेलेल्या परळ स्टेशनचा लवकरच कायापालट केला जाणार आहे. दादरच्या आधीचं स्टेशन असलेल्या परळला रेल्वेचं नवं टर्मिनस उभारण्यात येईल अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. टर्मिनससाठी स्टेशनवर नवे प्लॅटफॉर्म, नवे फुटओव्हर ब्रिज, नवे तिकिट काऊंटर, तसंच नव्यानं एलिव्हेटेड फुट ओव्हर ब्रिज तयार केले जाणार आहेत. स्टेशनवरच्या सर्व प्लॅटफॉर्मची रुंदी १० मीटरनं वाढवण्यात येणार आहे. या सर्व कायापालटासाठी ५१ ते ५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी २१ कोटींचं टेंडर निश्चित झालं आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जवळपास २ वर्षांचा कालावधी लागणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























