एक्स्प्लोर
विरारमध्ये नवविवाहितेचा जळून मृत्यू, पती पोलिसांच्या ताब्यात
![विरारमध्ये नवविवाहितेचा जळून मृत्यू, पती पोलिसांच्या ताब्यात Newly Married Girl Death In Virar Husband Arrested विरारमध्ये नवविवाहितेचा जळून मृत्यू, पती पोलिसांच्या ताब्यात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/10/29055602/crime-scene.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
विरार: विरारमध्ये एका नवविवाहितेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
विरार पश्चिमेला शुभ-लाभ इमारतीत राहणाऱ्या अर्पणा सांबारेचं अवघ्या महिन्याभरापूर्वी 11 फेब्रुवारीला सागर सांबारेशी लग्न झालं होतं. अर्पणा नेहमी सोशल मीडियावर मित्रांशी चॅटिंग करायची यावरुन त्या दोघांत नेहमी वाद व्हायचा.
काल संध्याकाळी सागरनं अर्पणाच्या वडिलांना फोन करुन तिनं आत्महत्या केल्याचं सांगितलं. मात्र, ही हत्या असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला तशी तक्रारही पोलिसात त्यांनी दिली. त्यावरुन पोलिसांनी सागर सांबारेला ताब्यात घेतलं.
दरम्यान, 28 वर्षीय सागर हा एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सागर कामावरून बराच लवकर निघाला होता. त्यामुळे सागरवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सागरला ताब्यात घेतले असले तरी अद्याप अधिकृत माहिती पोलिसांनकडून देण्यात आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)