बदलापुरात नवजात स्त्री अर्भकाला रस्त्यावर फेकलं
शनिवारी रात्री उशिराच्या सुमारास गावाजवळ अज्ञातांनी एक स्त्री जातीचं अर्भक रस्त्यावर फेकून दिलं. या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या घरातील तरुणानं शोध घेतला असता त्याला हे अर्भक आढळून आलं.

कल्याण : एकीकडे स्त्री भ्रूण हत्येविरोधात जनजागृती केली जात असताना बदलापुरात एका स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला रस्त्यावर फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरच्या बारवी धरण परिसरात ही घटना घडली आहे.
बारवी धरण परिसरातल्या पिंपलोळी गावाजवळ हा प्रकार घडला. शनिवारी रात्री उशिराच्या सुमारास गावाजवळ अज्ञातांनी एक स्त्री जातीचं अर्भक रस्त्यावर फेकून दिलं. या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या घरातील तरुणानं शोध घेतला असता त्याला हे अर्भक आढळून आलं.
याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या अर्भकाला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. रस्त्यावर फेकून दिल्यामुळे या अर्भकाच्या गालावर खरचटलं असून डोक्यालाही मार लागला आहे.
मध्यवर्ती रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ सध्या या बाळावर उपचार करत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी अशाप्रकारे अर्भक फेकून देणाऱ्या निर्दयी माता-पित्याचा शोध सुरू केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
