एक्स्प्लोर

MNS Adhiveshan | मनसेचं मुंबईत महाअधिवेशन, 'राज'गर्जनेकडे महाराष्ट्राचं लक्ष

राजकीय आखाड्यात पुन्हा जोमाने उतरण्यासाठी राज ठाकरेंनी मनसेचं इंजिन हिंदुत्त्वाच्या रुळावर पळवण्याची तयारी केली आहे. मुंबईत गोरेगावमधल्या नेस्को मैदानावर होणाऱ्या मनसेच्या अधिवेशनात राज ठाकरे काय गर्जना करणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे.

मुंबई : सत्तेच्या समीकरणात फक्त एका आमदारापुरतं अस्तित्व उरलेल्या मनसेने कात टाकण्याची तयारी पूर्ण केली आहे. मुंबईतल्या गोरेगावमधील नेस्को मैदानावर आज मनसेचं महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे काय गर्जना करणार? याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. शिवाय आजच्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने राज ठाकरेंचे पुत्र अमित यांच्या राजकारणातल्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. दीपप्रज्वलन करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाअधिवेशनाचं उद्घाटन करतील. त्यानंतर दोन-तीन नेत्यांची भाषणं होतील. या महाअधिवेशनात विविध मुद्द्यांवर सात ते आठ ठराव मांडले जाणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

तर "दिवसभर मनसेचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी नऊ वाजता राज ठाकरे नव्या झेंड्याचं अनावरण करतील, तर संध्याकाळी सहानंतर राज ठाकरेंचं भाषण होईल. तसंच अमित ठाकरे यांच्यावर वेगळी जबाबदारी दिली जाईल," असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

राजकीय आखाड्यात पुन्हा जोमानं उतरण्यासाठी राज ठाकरेंचं इंजिन हिंदुत्वाच्या रुळावर पळवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मनसे भगव्या झेंड्यासह पुढील वाट धरणार आहे. मनसेच्या या नव्या चेहऱ्याने महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण बदलणार का यावर राजकीय विश्लेषकांमध्ये खलबतं सुरु आहेत.

नव्या झेंड्याचं अनावरण होणार? आजच्या अधिवेशनात राज ठाकरे मनसेच्या कोणत्या झेंड्याचं अनावरण करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी मनसेचे नवे झेंडे एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. मनसेच्या जुन्या झेंड्यातला हिरवा आणि निळा हे रंग हटवण्यात आले असून, फक्त भगवा रंग ठेवण्यात आला आहे. पक्षाचा झेंडा म्हणून भगव्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा, तर निवडणुकीचं चिन्ह म्हणून भगव्यावर रेल्वे इंजिन असे मनसेचे नवे झेंडे आहेत. राज ठाकरेंच्या मनसेची हिंदुत्त्वाच्या दिशेनं वाटचाल सुरु झाल्याचं भगव्या झेंड्यातून प्रतीत होत आहे.

राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दरम्यान, नेस्को ग्राऊंडवर मध्यरात्रीपासूनच महाराष्ट्रभरातून मनसेचे कार्यकर्ते दाखल होत आहेत. पुणे, सातारा, जळगाव, पिंपळगाव, नाशिक इथूनही कायकर्ते मुंबईत पोहोचत आहेत. आज राज ठाकरे काय बोलणार आणि मनसेचा नवीन ध्वज प्रत्यक्ष बघण्याची उत्सुकता त्यांच्या मनात आहे.

डोंबिवलीतून कार्यकर्ते रवाना मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी डोंबिवलीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात रवाना झाले आहेत. डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेतून कार्यकर्त्यांच्या बसेस रवाना झाल्या आहे. डोंबिवली हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातो. डोंबिवलीचा समावेश असलेल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हेदेखील निवडून आले आहेत. त्यामुळे डोंबिवलीत अधिवेशनापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. आज सकाळी सहा वाजल्यापासून शेकडो कार्यकर्ते बसमधून मुंबईकडे रवाना झाले.

दहा हजार लोकांच्या जेवणाची तयारी मनसेच्या महाअधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरु आहे. या अधिवेशनात दहा हजार लोकांचं जेवण तयार होत आहे. नाश्त्यासाठी उपमा आणि चहा तर जेवणात वरण, भात, भाजी, पोळी आणि गोड पदार्थ असा जेवणाचा बेत आहे.

संबंधित बातम्या

राज ठाकरे भगव्या वाटेवर आहेत का? हिंदुत्वाच्या मुद्द्याचा मनसेला किती फायदा होईल?

महाअधिवेशनासाठी मनसेची जय्यत तयारी; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही ई-पीक पाहणी केलीय का? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला मोठा निर्णय 
तुम्ही ई-पीक पाहणी केलीय का? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला मोठा निर्णय 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, महानगर गॅसकडून CNG दरात वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू
मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, महानगर गॅसकडून CNG दरात वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
NCP Merger : सुप्रिया सुळेंकडून विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट, आता खासदार निलेश लंके म्हणाले, आमचा नेता जो निर्णय घेईल...
आमचा नेता खंबीर, ते जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत आहोत, खासदार निलेश लंके म्हणाले...
Embed widget