एक्स्प्लोर

मुंबईतील नव्या बांधकामांना सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर साल 2016 पासून लागू असलेली बंदी उठवत नवीन बांधकामाला हायकोर्टाने सशर्त परवानगी दिली.

मुंबई/नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने मुंबईतील नवीन बांधकामांवरील बंदी 6 महिन्यांकरता उठवत तमाम मुंबईकर, महनगरपालिका आणि राज्य सरकारलाही मोठा दिलासा दिलाय. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर साल 2016 पासून लागू असलेली बंदी उठवत नवीन बांधकामाला हायकोर्टाने सशर्त परवानगी दिली. हायकोर्टाच्या निर्णयाला महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्यावतीने सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस.ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल.नागेश्वर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. मुंबईतील विकासकांनी घेतलेली मोठी कर्ज यांचाही सुप्रीम कोर्टाने विचार केला. मात्र ही बंदी उठवताना सुप्रीम कोर्टाने देवनार आणि मुलुंड क्षेपणभूमीवर नवा कचरा टाकण्यास मनाई केली. यावर उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने अशा 10 नव्या जागांची यादी सादर केली, जिथे जमिनीची होणारी धूप भरून काढण्यासाठी डेब्रिज टाकण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या जागा मालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवणं महापालिकेला अनिवार्य असेल, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. यांसह इतर बाबींची काटेकोरपणे पूर्तता होतेय की नाही यासंदर्भात मुंबई महापालिकेला सविस्तर पाहणी अहवाल सादर करण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले. मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने साल 2019 पर्यंत मुंबईत नव्या बांधकामांवर बंदी घातली होती. घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून हायकोर्टाने ही बंदी घातली होती. मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनात पूर्णपणे अपयशी ठरली होती. घनकचरा व्यवस्थापनाच्या कारणास्तव साल 2016 मध्ये हायकोर्टाने बीएमसीला फटकारत मुंबईत नवीन बांधकामांवर बंदी घातली. मात्र यातून इमारतींचा पुनर्विकास, दुरूस्ती आणि नवीन हॉस्पिटल, शाळा, कॉलेज यांच्या उभारणीला वगळण्यात आलं. नवीन डम्पिंग ग्राऊंड कार्यान्वित होत नाही तोपर्यंत ही बंदी लागू राहिल, असंही हायकोर्टाने स्पष्ट केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Convoy Vehicles Accident : जरांगेंच्या ताफ्यातील 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Embed widget