एक्स्प्लोर

भुजबळांना झेड प्लस सुरक्षा द्या, राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली. जयंत जाधव आणि पंकज भुजबळ यांनी काल मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली

मुंबई : नुकतेच तुरुंगातून सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना 'झेड प्लस' सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. जयंत जाधव आणि पंकज भुजबळ यांनी काल मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आणि ही मागणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन छगन भुजबळ यांच्या जीविताला धोका असून त्यांना 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची विनंती केली. काय लिहिलंय पत्रात? "राज्याचे गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी टोळीयुद्धाचा बिमोड करण्यासाठी अनेक गुंडांवर कारवाया केल्या आहेत. यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे. तरी त्यांना असलेली 'झेड प्लस' सुरक्षा पूर्ववत करण्यात यावी ही विनंती", असं पत्रात म्हटलं आहे. भुजबळ सुटले! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना 4 मे रोजी जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर आले. मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वय लक्षात घेत जामीन मंजूर केला. भुजबळांना 5 लाखांचा जामीन मंजूर झाला. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ अटकेत होते. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केलं. त्याचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी होती. संबंधित बातम्या : छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?   छगन भुजबळांची चौकशी आणि अटकेचा संपूर्ण घटनाक्रम  कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?  ‘माझ्यावरील आरोप खोटे, दमानियांवर कायदेशीर कारवाई करु’, भुजबळांचं जेलमधून पत्र  भुजबळ लढवय्ये, ते जेलबाहेर आले पाहिजेत: मंत्री दिलीप कांबळे 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
Contractors: शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Embed widget