प्रभाकर साईल यांनी केलेले आरोप ऐकीव माहितीवर आधारित; त्यांनी न्यायालयात मत मांडावं: NCB
Drug Case : एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करणार होते पण तब्बल तिसऱ्यांदा ही पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे.
![प्रभाकर साईल यांनी केलेले आरोप ऐकीव माहितीवर आधारित; त्यांनी न्यायालयात मत मांडावं: NCB NCB Press Note the allegations made by Prabhakar Sail are based on anecdotal information needs to submit his prayer to court प्रभाकर साईल यांनी केलेले आरोप ऐकीव माहितीवर आधारित; त्यांनी न्यायालयात मत मांडावं: NCB](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/04/cef4d28b3a117a20bfde26877ee47840_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : प्रभाकर साईल यांनी जो काही दावा केलाय, एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर जो काही आरोप केलाय तो केवळ ऐकीव माहितीवर आधारित आहे, त्याने आपले मत हे न्यायालयात मांडावं असं NCB ने म्हटलं आहे. एनसीबीने एक प्रेस नोटच्या माध्यमातून हे सांगितलं आहे. दरम्यान, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करणार होते पण तब्बल तिसऱ्यांदा ही पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे.
एनसीबीने आपल्या प्रेस नोटमध्ये काय म्हटलंय?
क्रुझ ड्रग्ज पार्टी कारवाई प्रकरणी पंच म्हणून नाव असणाऱ्या प्रभाकर साईल यांनी जो काही दावा केलाय तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामध्ये असं सांगण्यात येतंय की 2 ऑक्टोबर रोजी जी काही कारवाई करण्यात आली त्या संबंधी आपण साक्षीदार असल्याचं प्रभाकर साईल यांनी सांगितलं आहे.
प्रभाकर साईल हे या प्रकरणातील महत्वाचे साक्षीदार असल्याने आणि हे प्रकरण सध्या न्यायालयासमोर प्रलंबित असल्याने, त्यांना जे काही सांगायचं आहे ते अॅफिडेव्हिटच्या माध्यमातून न्यायालयात सादर करावं. या प्रकरणी प्रभाकर साईल यांनी काही व्यक्तींच्यावर आरोप केला आहे तो फक्त ऐकीव माहितीवर आधारित आहे.
आमचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केलं आहे. यातील काही माहिती ही तपासाबाबत अत्यंत महत्वाची आहे आणि न्यायप्रलंबित आहे. त्यामुळे प्रभाकर साईल यांनी दाखल केलेलं अॅफिडेव्हिट हे एनसीबीच्या महासंचालकांना पाठवत आहोत आणि प्रभाकर साईल यांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती करत आहोत.
आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल यांनी केला आहे. दरम्यान, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी या आरोप फेटाळून लावले आहेत.
कोण आहे प्रभाकर साईल?
प्रभाकर साईल हे क्रुझ कारवाई प्रकरणातील प्रथम क्रमांकाचे नाव असणारे पंच आहेत.
हा पंच किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड आहे.
किरण गोसावींकडेच याची राहण्याची व खाण्याची व्यवस्था आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)