एक्स्प्लोर
निवडणुका असलेल्या राज्यांना महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
ज्या राज्यात निवडणुका आहेत, तिथे भारनियमन नको म्हणून महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा त्या राज्यांना दिला जातोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
मुंबई: राज्यात 10 तास अघोषित भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन राजकीय आहे. राज्याच्या वाट्याचा कोळसा राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात पाठवला जातोय. या राज्यात भाजपाचे सरकार आहे, तिथे आता निवडणुका आहेत. त्यामुळे तिथे भारनियमन नको म्हणून महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा त्या राज्यांना दिला जातोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
ज्या राज्यात निवडणुका आहेत, त्या जिंकण्यासाठी महाराष्ट्र अंधारात ठेवला जातोय. या राज्यांसाठी भाजपाने आपले राज्य अंधारात ठेवले आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
राजस्थानमध्ये दीड महिना भारनियमन सुरु होते, आता तिथे भारनियमन नाही. आपल्या राज्यात 10 दिवस झाले भारनियमन सुरु झाले आहे, त्यामागे हे खरं कारण आहे, असा आरोप मलिक यांनी केला.
“नर्मदा प्रकल्पातील 400 मेगावॅट वीज गुजरातने आपल्याला देणे बंधनकारक असताना, ती वीजही मिळत नाही. त्यामुळे राज्यात कोळशाचा तुटवडा आहे. सरकार सांगते देशपातळीवर कोळशाचा तुटवडा आहे, हे खोटे आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कंत्राटदार होते, ते आपल्या पत्नीला कंत्राट कसे मिळेल याच्याच मागे लागलेले असतात. त्यामुळे ऊर्जा खात्याची लुटमार सुरु आहे”, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला.
जिथे भारनियमन आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस 12 तारखेला कंदिल आंदोलन करणार असल्याचं यावेळी नवाब मलिक यांनी सांगितलं.
दिवाकर रावतेंना टोला
मंत्री ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यांनी एसटीमध्ये भाड्याने बस लावल्या आहेत. त्याचे हफ्ते त्यांना मिळत आहेत. त्यामुळे कर्मचारी नाही तर हफ्ते वाढल्याने मंत्रीच वेडे झाले आहेत, असं नवाब मलिक म्हणाले.
संबंधित बातम्या
एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढवले, की ते वेडे झाले : रावते
लोडशेडिंग सुरु, तोडफोड झाल्यास प्रशासन जबाबदार, आव्हाड आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement