एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : नवी मुंबई... कॉर्पोरेटचं नेक्स्ट डेस्टिनेशन

गेल्या पाच वर्षांतला ट्रेण्ड पाहता भविष्यात नवी मुंबई उद्योग जगतासाठी हॉट डेस्टिनेशन होणार आहे.

मुंबई : नवी मुंबई... कॉर्पोरेट्सचं नेक्स्ट डेस्टिनेशन. मुंबईच्या शेजारी असलेलं नियोजनबद्ध शहर. मोठे रस्ते, भरपूर मोकळी जागा, मोठ्या इमारती, मुबलक पार्किंग स्लॉट्स, चांगली आरोग्यसेवा, वर्ल्ड क्लास पार्क्स... ही नवी मुंबईची ओळख आहे. दहा वर्षापूर्वीपर्यंत नवी मुंबईत यायला कॉर्पोरेट्स उत्सुक नव्हते. पण हा ट्रेंड गेल्या पाच वर्षांत बदलू लागला आहे. रिलायन्स, एल अँड टी, कॅपजेमिनीसारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी आपलं बस्तान नवी मुंबईत हलवलं. त्याचवेळी नवी मुंबई विमानतळाच्या कामानं जोर पकडला. त्यामुळे भविष्यात नवी मुंबई उद्योग जगतासाठी हॉट डेस्टिनेशन होणार आहे. मुंबईत पाय ठेवायला जागा नाही. कॉर्पोरेट अधिकारी असो किंवा मग साधा कामगार प्रवास करताना दमछाक होते. शिवाय जागांचे दर गगनाला भिडलेत. अशावेळी नवी मुंबईसारखा पर्याय कुठे सापडणार? जेएलएएल प्रॉपर्टी कन्सलटंटच्या मते, पुढच्या 5 वर्षात 344 स्क्वेअर किलोमीटरमध्ये जवळपास 80 लाख स्क्वेअर फूट जागेवर आयटी पार्क उभी राहतील. शहराचं नियोजन करणारं सिडको खारघरमध्ये 120 हेक्टरवर आयटी पार्क उभारण्याची तयारी करत आहे. ही जागा इतकी मोठी आहे, की इथं दोन बांद्रा-कुर्ला काँप्लेक्स उभी राहतील. सध्या सिडकोनं वाशी आणि बेलापूरमध्ये 16 लाख स्क्वेअर फूटावर आयटी पार्क उभी केली आहेत. याशिवाय मेट्रोचं जाळं विणण्याचं काम सुरु आहे. रेल्वेची कनेक्टिविटी उरणपर्यंत पोहोचली आहे. विमानतळाचं काम वायुवेगाने सुरु आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात नवी मुंबईचं महत्व मुंबईच्या तुल्यबळ असेल. नवी मुंबई कॉर्पोरेट्सच्या डोळ्यात भरण्याचं आणखी एक कारण म्हणजे स्वस्ताई. राहण्यासाठी, कार्यालयांसाठी, हॉटेल्ससाठी लागणारी जागा मुंबईपेक्षा स्वस्त आहे. आता जेव्हा कॉर्पोरेट्स नवी मुंबईत येतील, तेव्हा रस्ते, वीज, पाणी, शिक्षणाच्या सुविधा उत्तम असाव्या लागतील. तर सिडकोनं आधीच पुढच्या 100 वर्षाचं नियोजन करत मूलभूत सुविधा कमी पडणार नाहीत, याची काळजी घेतली आहे. स्वत:च्या मालकीचं धरण उभारणारी नवी मुंबई आशियातली पहिली पालिका आहे. याशिवाय भारती विद्यापीठ, डी.वाय पाटील, विद्यापीठ, एमजीएम, तेरणा अशा नामवंत कॉलेजेसमुळे नवी मुंबई आधीच एज्युकेशनल हब बनलंय. त्यामुळे मुंबईचा भार थोडा हलका होईल, मुंबईला मोकळा श्वास घेता येईल, यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget