एक्स्प्लोर
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांचं निलंबन
विधानपरिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे हेमंत नगराळेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
![नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांचं निलंबन Navi Mumbai Police commissioner Hemant Nagarale Suspended latest update नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांचं निलंबन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/20234609/Hemant-Nagrale.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. विधानपरिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणं नगराळेंना भोवलं
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हेमंत नगराळे यांनी दिले होते. विधानपरिषदेच्या सभापतींच्या परवानगीविना कोणत्याही आमदारावर गुन्हे दाखल करता येत नाहीत. त्यामुळे नगराळेंसह उपायुक्त तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.
विधानपरिषदेची परवानगी न घेताच जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्रक्रियेचे पालन केलं नसल्यास निलंबित करावं, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल दिले होते. याबाबतच्या इतिवृत्तात पोलिस आयुक्त हेमंत नागराळे आणि उपायुक्त तुषार दोषी यांच्या नावाचा उल्लेख नसल्याची बाब जयंत पाटील यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
अधिकार नसताना बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश या अधिकाऱ्यांनी दिले. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. त्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)