एक्स्प्लोर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामातील अडथळा दूर
नवी मुंबई : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे 2019 अखेरीस या विमानतळावरुन पहिलं उड्डाण व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
पर्यावरण मंत्रालयाने दुसऱ्या आणि महत्त्वाच्या टप्प्यातील परवानगी दिली आहे. त्यामुळे उलवे टेकडीची उंची कमी करणं, तसंच नदीचं पात्र वळवणं याशिवाय प्रकल्पग्रस्त नागरिकांचं पुनर्वसन या कामांना सुरुवात होणार आहे.
या विमानतळासाठी सिडकोने 250 एकर जागा दिली आहे. तसंच जेवढी जमीन अधिग्रहित केली, त्याच्या तिप्पट खारपुटीचं रोपण करण्याचं आश्वासन सिडकोने दिलं आहे. कामोठेजवळच्या कोळीखार गावात खारफुटीचं रोपण सुरु झालं आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पर्यावरण विभागाने 35 अटी ठेवल्या होत्या. त्यापैकी बहुतांश अटी सिडकोने पूर्ण केल्या आहेत.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआएएल) या कंपनीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कंत्राट देण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement