(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी मुंबईत सिलेंडर मधून गॅस चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात
एकिकडे घरगुती वापरातील गॅस सिलेंडरचे दर सातत्यानं वाढत असतानाच ही टोळी कमी गॅस असणारे सिलेंडर लोकांच्या गळ्यात मारून फसवणूक करत होती.
नवी मुंबई : गेल्या काही दिवसात सिलेंडरच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने याचा फायदा उचलण्यासाठी गॅस चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सानपाड़ा येथे अंधारात टेम्पो मध्ये ठेवण्यात आलेल्या सिलेंडर मधून गॅस चोरी करण्यात येत होती.
हा टेम्पो एका गॅस एजन्सीचा असून, तो सिलेंडरने भरलेला होता. इथे, गॅस चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर लगेचच छापा टाकण्यात आला. ज्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली. घटनास्थळावरुन दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ साखर कारखाना कर्मचाऱ्यांकडून थकीत वेतनासाठी बंद
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता, ते गॅस ऐजन्सी मध्ये काम करणारे कर्मचारी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गॅस एजन्सी कर्मचाऱ्याकडूनच भरलेल्या सिलेंडर मधील गॅस रिकाम्या सिलेंडर मध्ये टाकला जात होता. यानंतर कमी वजनाचे सिलेंडर रहिवाशांच्या गळ्यात घालून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती. दुसरीकडे चोरलेला गॅस ब्लॅक मध्ये विकून जास्तीचे पैसे गॅस ऐजन्सीचे कर्मचारी कमवीत होते.
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढताहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित कोलमडलं. एकीकडे इंधनाचे हे दर वाढत असतानाच आता सिलेंडरवरची सबसिडी मात्र कमी करण्यात आली आहे.