Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर काल रात्री वणवा त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते. हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. खारघरच्या डोंगरावर लागलेली आग विझलेली आहे. रात्री 3 च्या दरम्यान आग नियंत्रणात आली होती. खारघर अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या आग नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत होत्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं. या आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.
खारघरच्या डोंगराला लागूनच अनेक रहिवाशी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे आहेत. दरम्यान, काल अशाचप्रकारे माथेरानच्या डोंगरावर वणवा पेटला होता. आणि आज खारघरचा डोंगर वणव्याचा वेढा पडलाय. त्यामुळं ही आग लागली की लावण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ : खारघरच्या डोंगरावर वणवा, शर्थीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात
नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर वणवा पेटला होता. सुका कचरा आणि गवतामुळं ही आग पसरत गेली. मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते. हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. डोंगराला लागूनच अनेक रहिवासी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे देखील आहेत.
माथेरानच्या डोंगरावरही पेटला होता वणवा
मुंबईनजिकचं थंड हवेचं ठिकाण अशी ओळख असलेल्या माथेरानच्या डोंगरावर वणवा पेटला होता. डोंगरमाथ्यावरच्या माथेरानपासून काही अंतरावर असलेल्या जुम्मापट्टी परिसरात अचानक वणवा लागला. त्यानंतर काही क्षणातच या आगीनं सारा डोंगर परिसर व्यापायला सुरुवात केली होती. या वणव्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा भक्ष्यस्थानी पडली असून वनसंपदेचं मोठं नुकसान झालं आहे. माथेरानच्या डोंगरावर हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Japan Earthquake : जपानला 7.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा जारी
- 2022 Hurun global rich list : मुकेश अंबानींचा अटकेपार झेंडा, टॉप 10 श्रीमंताच्या यादीत एकमेव भारतीय
- कांद्याचे दर कोसळले, दहा दिवसांत किलोमागे 14 रुपयांची घट, शेतकऱ्यांना फटका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha