Hurun Global Rich List 2022 : नुकतीच हुरून ग्लोबल रिच यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये टॉप 10 मध्ये मुकेश अंबानी यांची वर्णी लागली आहे. टॉप 10 मध्ये असणारे मुकेश अंबानी एकमेव भारतीय आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पुनावाला, डीमार्टचे संस्थापक आर. के दमानी आणि स्टील उद्योगपती लक्ष्मी मित्तल या तीन जणांचाही हारुन ग्लोबल रिचच्या अव्वल 100 जणांच्या यादीत समावेश झाला आहे. 


रिलायन्स उद्योगसमूहाचे मुकेश अंबानी जगातील अव्वल दहा अब्जाधीशांच्या यादीत असणारे एकमेव भारतीय आहेत. हुरून आणि रिअल इस्टेट ग्रुप M3M यांनी मिळून जगातील श्रीमंताची यादी तयार केली आहे. The 2022 M3M Hurun Global Rich List असे रिपोर्ट्सचे नाव आहे. अदानी ग्रुपच्या संपत्तीमध्ये जगात सर्वाधिक वाढ होत असल्याचेही या यादीत म्हटलेय.  2021 मध्ये अदानी ग्रुपच्या संपत्तीमध्ये 49 अब्ज डॉलरमध्ये वाढ झाली आहे. अदानी ग्रुपच्या रिन्यूअबल एनर्जी कंपनी अदानी ग्रीनच्या लिस्टिंगनंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली.  अदानी यांची संपत्ती 17 अब्ज डॉलरवरुन 81 अब्ज डॉलर इतकी झाली. मुकेश अंबानी यांच्यानंतर 69 वर्षीय अदानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. हुरुन यांच्या रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती 133 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 24 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे गौतम अदानीच्या संपत्तीमध्ये 2021 मध्ये 153 टक्के वाढ पाहायला मिळाली. जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत गौतम अदानी 12 व्या क्रमांकावर आहेत. तर मुकेश अंबानी नवव्या क्रमांकावर आहेत. 


SpaceX आणि Tesla चे संस्थापक  एलॉन मस्क (Elon Musk) पहिल्या क्रमांकावर आहेत. Amazon चे जेफ बेजोस (Jeff Bezos) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर LVMH चे Bernard Arnault तिसऱ्य क्रमाकावर आहेत.  नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायरही 7.6 अब्ज डॉलर संपत्तीसह हारून ग्लोबल रिच लिस्ट 2022 मध्ये पोहचल्या आहेत. भारतातील अब्जाधीशांच्या यादीमध्ये मुकेश अंबानी 103 कोटी अब्ज डॉलर संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.तर 81 अब्ज डॉलर संपत्तीसह गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शिवनाडार आणि फेमली 28 अब्ज डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सायरस पुनावाला 26 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत. 25 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह लक्ष्मी मित्तल पाचव्या क्रमांकावर आहेत.