Japan Earthquake : उत्तर जपानमधील फुकुशिमा शहराच्या किनारपट्टीला 7.1 मॅग्निट्यूडच्या भूकंपाचा धक्का बसला असून त्यामुळे या परिसरात त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. हा भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्राच्या 60 किमी खोलावर असल्याचं जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने स्पष्ट केलं आहे. 


जपानमधील फुकुशिमा आणि मियागी या ठिकाणी हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यानंतर या दोन्ही ठिकाणी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. राजधानी टोकियोला देखील भूकंपाचा धक्का बसला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास जपानमध्ये हा भूकंपाचा धक्का बसला आहे. जपानच्या भूकंपानंतर सुमारे 20 लाख घरांची वीज गायब झाली आहे. 


तीन फुट उंच त्सुनामीच्या लाटांचा इशारा
जपानच्या हवामान खात्याने फुकुशिमा आणि मियामी या भागाच्या किनारपट्टीवर एक मिटर म्हणजे तीन फुट उंच त्सुनामीच्या लाटांचा इशारा दिला आहे. या परिसरातील काही भागात त्सुनामी पोहोचलेली असेल असं जपानच्या राष्ट्रीय वाहिनीने सांगितलं आहे. 


 




दरम्यान, भूकंपाच्या या धक्क्यानंतर फुकुशिमा दायची न्यूक्लिअर  प्लॅन्टची कुलिंग सिस्टिम बंद पडली असल्याची माहिती या प्लॅन्टचे व्यवस्थापन करणाऱ्या द टोक्यो इलेक्ट्रिक पॉवर कंपनी होल्डिंगने दिली आहे.


याच प्रदेशात त्सुनामी आली होती
या आधीही, 11 वर्षांपूर्वी, जपानमध्ये याच प्रदेशात त्सुनामीचा तडाखा बसला होता. त्यामुळे न्युक्लिअर प्लॅन्टचे नुकसान होऊन मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय.


महत्त्वाच्या बातम्या :