एक्स्प्लोर
लग्नासाठी सुट्टी मागणाऱ्या डॉन अबू सालेमचा अर्ज फेटाळला!
अबू सालेमनं लग्नासाठी 45 दिवस सुट्टी मिळावी म्हणून अर्ज केला होता. मात्र नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी तो फेटाळला.
![लग्नासाठी सुट्टी मागणाऱ्या डॉन अबू सालेमचा अर्ज फेटाळला! Navi Mumbai Commissioner has rejected parole application of 1993 Mumbai blasts case convict Abu Salem; he had sought the parole for getting married लग्नासाठी सुट्टी मागणाऱ्या डॉन अबू सालेमचा अर्ज फेटाळला!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/16130636/Abu-Salem.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळण्यात आला आहे. अबू सालेमनं लग्नासाठी 45 दिवस सुट्टी मिळावी म्हणून अर्ज केला होता. मात्र नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी तो फेटाळला.
मुंब्र्यातील कौसर नावाच्या तरुणीशी माझा ट्रेनमध्ये निकाह झालाच नव्हता. ती फक्त भेटण्यास आली होती. मात्र, मीडियात आलेल्या वृत्तांमुळे तिचे नाव माझ्याशी जोडले गेले आणि तिची बदनामी झाली. मला आता तिच्याशी विवाह करावाच लागणार आहे, असं पत्र सालेमनं गृहविभाग आणि तळोजा जेल प्रशासनाला लिहिल होतं. मात्र प्रशासनानं त्याला पेरोल देण्यास नकार दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गेल्यावर्षी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचे धावत्या ट्रेनमध्ये लग्न झालेले आहे अशी बातमी फोटोसह एका वृत्तपत्रात आली होती. ठाण्याजवळच्या मुंब्र्यातील कौसर नावाच्या एका मुलीशी 2014 साली अबू सालेमने धावत्या ट्रेनमध्ये लग्न केल्याचे फोटो समोर आले होते. ज्यात कौसर अबू सालेमसोबत ट्रेनमध्ये दिसत होती.
हे फोटो आल्यानंतर स्वत: अबू सालेमनेही मुंब्र्यातील कौसर नावाच्या या मुलीसोबत आपले संबंध असल्याचे न्यायालयात कबूल केले होते. एवढचं नाही तर, आपल्याला त्या मुलीशी लग्न करायचे आहे, त्याकरता परवानगीदेखील अबू सलेमने न्यायालयाकडे मागितली होती.
लिस्बन, पोर्तुगाल येथून अबू सालेमचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात अबू सालेमवर गंभीर स्वरुपाचे खटले सुरू आहेत, त्यामुळे त्याला बऱ्याचदा दुसऱ्या राज्यांतील कोर्टात ट्रेनने नेल- आणलं जातं होतं.
अबू सालेमशी ट्रेनमध्ये लग्न झाल्याच्या खोट्या बातम्यांमुळे आपलं जगणं मुश्किल झालं आहे, त्यामुळे आता मला अबू सालमेशीच लग्न करावं लागेल असं कौसरने 2016मध्ये टाडा कोर्टात म्हटलं होतं.
मुंबईतील 93 च्या साखळी बॉम्बस्फोटात अबू सालेमचा हात आहे. तसेच खंडणी, हत्या यांसारखी प्रकरणेही त्याच्याविरोधात सुरु आहेत.
टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सध्या तो नवी मुंबईतील तळोजा या ठिकाणी असलेल्या तुरुंगात तो शिक्षा भोगतोय.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)