एक्स्प्लोर

नवी मुंबईत 'सिडको'च्या 15 हजार घरांसाठी 2 लाख अर्ज

'सिडको'च्या 15 हजार घरांची ऑनलाईन सोडत 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता निघणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईतील 'सिडको'च्या 15 हजार घरांसाठी तब्बल दोन लाख अर्ज आले आहेत. ज्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे, त्यांना आज रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. घरांची ऑनलाईन सोडत 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता निघणार आहे. सिडकोच्या माध्यमातून घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या पाच नोडमध्ये अल्प उत्पन्न आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 15 हजारच्या आसपास घरं उभारली जात आहेत. अपेक्षेप्रमाणे या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वसामान्य ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने विविध आर्थिक गटांसाठी नवी मुंबई क्षेत्रात पुढील वर्षभरात 55 हजार घरं बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी 14 हजार 820 घरांचं बांधकाम प्रगतिपथावर आहे. एमएमआरडीए रेंजमध्ये म्हणजेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली भागात ज्यांच्या नावावर घर आहे, त्यांना या घराचा लाभ घेता येणार नाही. Cidco Lottery 2018: सिडको लॉटरी, घरांच्या किमती, एरिया आणि सर्व काही सिडकोने याआधी विविध गृहप्रकल्प उभारले आहेत, परंतु एकाच वेळी 14 हजार 820 घरांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पातील अत्यल्प गटातील घरं पंतप्रधान आवास योजनेसाठी असतील. सिडकोने आतापर्यंत विविध घटकांसाठी सव्वा लाख घरांची निर्मिती केली आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात बजेटमधील घरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. आजही सिडकोच्या घरांना सर्वसामान्य घटकांची पसंती आहे, त्यामुळेच आगामी काळात विविध घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. पंधरा हजार घरांचा पहिला टप्पा पूर्ण करतानाच पुढील वर्षभरात 40 हजार घरांचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या घरांच्या बांधकामालाही लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : पाच तास अॅम्ब्युलन्स नाही, कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात महिलेचा मृत्यू, दोन महिन्यात तिसरा जीव गेला
पाच तास अॅम्ब्युलन्स नाही, कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात महिलेचा मृत्यू, दोन महिन्यात तिसरा जीव गेला
Akola Rain: आठवडाभरापासून तापमान 45 अंशांपर्यंत, अकोल्यात अचानक पावसाच्या हजेरीने दिलासा; चिमुकल्यांनी पावसात भिजत लुटला आनंद
आठवडाभरापासून तापमान 45 अंशांपर्यंत, अकोल्यात अचानक पावसाच्या हजेरीने दिलासा; चिमुकल्यांनी पावसात भिजत लुटला आनंद
Share Market : सेन्सेक्स 155 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 700000 कोटी बुडाले, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
सेन्सेक्स 155 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 700000 कोटी बुडाले, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
India at 2047 Summit: भारत ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार सामंजस्य करार, एबीपीच्या मंचावरुन नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा  
India at 2047 Summit: भारत ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार सामंजस्य करार, एबीपीच्या मंचावरुन नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour LIVE :   मनपा निवडणुकांमध्ये ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस कमबॅक करतील का?Narendra Modi Speech : भारताच्या हक्काचं पाणी हे भारतासाठीच वाहणार,  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धारABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 06 May 2025100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 06 May 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : पाच तास अॅम्ब्युलन्स नाही, कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात महिलेचा मृत्यू, दोन महिन्यात तिसरा जीव गेला
पाच तास अॅम्ब्युलन्स नाही, कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात महिलेचा मृत्यू, दोन महिन्यात तिसरा जीव गेला
Akola Rain: आठवडाभरापासून तापमान 45 अंशांपर्यंत, अकोल्यात अचानक पावसाच्या हजेरीने दिलासा; चिमुकल्यांनी पावसात भिजत लुटला आनंद
आठवडाभरापासून तापमान 45 अंशांपर्यंत, अकोल्यात अचानक पावसाच्या हजेरीने दिलासा; चिमुकल्यांनी पावसात भिजत लुटला आनंद
Share Market : सेन्सेक्स 155 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 700000 कोटी बुडाले, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
सेन्सेक्स 155 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 700000 कोटी बुडाले, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
India at 2047 Summit: भारत ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार सामंजस्य करार, एबीपीच्या मंचावरुन नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा  
India at 2047 Summit: भारत ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार सामंजस्य करार, एबीपीच्या मंचावरुन नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा  
Pahalgam Terror Attack: केंद्र सरकारनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं सडेतोड प्रत्युत्तर द्यावं, ओवेसींचा काश्मीरमधून पाकिस्तानवर हल्लाबोल
केंद्र सरकारनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं सडेतोड प्रत्युत्तर द्यावं, ओवेसींचा काश्मीरमधून पाकिस्तानवर हल्लाबोल
India Vs Pakistan War : पाकिस्तानातील पंजाबमधून भारतीय सीमेकडे लष्कराचा ताफा;  व्हिडीओ आला समोर, पाकड्यांच्या कुरपती सुरूच
पाकिस्तानातील पंजाबमधून भारतीय सीमेकडे लष्कराचा ताफा; व्हिडीओ आला समोर, पाकड्यांच्या कुरपती सुरूच
Bilawal Bhutto : सिंधू नदीत रक्त सांडण्याची भाषा करणाऱ्या बिलावल भुट्टोंची माघार, आता भारताकडेच मदत मागत म्हणाले...
अगोदर सिंधू नदीत रक्त सांडण्याची भाषा, आता बिलावल भुट्टोंचा यूटर्न, भारताला साद घालत म्हणाले...
भारताची अर्थव्यवस्था 2025 मध्येच जपानला मागं टाकणार, वर्ष संपण्याअगोदर चौथ्या स्थानावर पोहोचणार,जर्मनीला कधी मागं टाकणार?
भारत 2025 मध्येच जपानला मागं टाकणार, जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था होणार, नवी अपडेट समोर
Embed widget