एक्स्प्लोर

नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईत येणार, गडकरीही उपस्थित राहणार; लोकसभा निकालानंतर पहिलाच दौरा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्प (जीएमएलआर) हाती घेण्यात आला आहे.

मुंबई : राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते शनिवार, दिनांक 13 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.  महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील. तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय आयुष (स्वतंत्र कार्यभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहील. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्प (जीएमएलआर) हाती घेण्यात आला आहे. सुमारे 12.20 किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरुन 25 मिनिटांवर येईल. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी 4.7 किलोमीटर अंतराच्या जुळा बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. याच जुळा बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, दिनांक 13 जुलै 2024 रोजी होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे सायंकाळी 5 वाजता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव नागरिकांनी कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या दोन तास आधी कार्यक्रमस्थळी पोहोचावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

जुळा बोगदा प्रकल्पाविषयी माहिती

• गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांब आणि ४५.७० मीटर रुंदीचा जुळा बोगदा. 
• जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर. 
• हा जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल भागात असेल.  
• प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील. 
• सुमारे १४.२ मीटर व्यासाच्या बोगदा खोदण्याच्या संयंत्राने (टीबीएम) होणार बोगद्याचे खोदकाम.
• बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुविजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश. 
• पर्जन्य जलवाहिनी, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जलवाहिन्या आदी उपयोगिता वाहिन्यांची बोगद्याच्या खाली व्यवस्था. 
• संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती, प्राणी तसेच आरे, विहार व तुळशी तलाव यांचे क्षेत्र बाधित न करता आणि त्यांना हानी न पोहोचवता बोगद्याचे बांधकाम होणार.
• प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भूसंपादन करण्यात आलेले नाही. 
•  प्राण्यांच्या सुरक्षित विहारासाठी  पशूपथाची निर्मिती. 
• कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे २२ हजार ४०० टनांनी घट होणार. 
• मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत आणि इंधनाचीही बचत होणार. 
• जुळा बोगद्याच्या निर्मितीसाठी अपेक्षित एकूण खर्च- ६३०१.०८ कोटी रुपये.
• जुळा बोगद्याचे काम पूर्णत्वास येण्याचा अंदाजित कालावधी- ऑक्टोबर २०२८ पर्यंत 
• प्रकल्पाची सद्यस्थिती: एकूण स्टेशन सर्वेक्षण, माती तपासणीची कामे, तात्पुरते रस्ते वळविण्याचे काम तसेच प्राथमिक संरेखन (डिझाइन) कार्य प्रगतिपथावर. 
• बोगदा प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता, तळमजला + २३ मजल्यांच्या ७ इमारती आणि तळमजला + ३ मजल्यांची बाजार इमारतीची कामे प्रगतिपथावर.

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्पाविषयी माहिती

• गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित. 
• प्रकल्पाची एकूण लांबी १२.२० किलोमीटर. 
• संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे एकूण १४ हजार कोटी रुपये खर्च.
• पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे स्थानकाजवळील मार्गांसह सध्याच्या उड्डाणपुलाचे (आरओबी) रुंदीकरण. 
• दुसऱ्या टप्प्यात ३० मीटर रुंद रस्त्याचे ४५.७० मीटरपर्यंत रुंदीकरण. 
• टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरीचे बांधकाम.
• टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे १.२२ किमी लांबीचा तिहेरी मार्गिका (३ बाय ३) असलेला पेटी बोगदा (कट अँड कव्हर) आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांबीचा जुळा बोगदा. 
•  चौथ्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली टोल नाकापर्यंत पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडणारा प्रस्तावित द्विस्तरीय उड्डाणपूल तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जीएमएलआरच्या जंक्शनवर वाहनांसाठी भूयारी मार्ग (व्हीयूपी) या कामांचा समावेश.  

 
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्पाचे फायदे

• गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता. विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस मोठा फायदा.
•  या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल. त्यामुळे, वाहतूक कोंडीपासून दिलासा. 
• या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाशी थेट जोडरस्ता उपलब्ध होणार.   
• नाशिक महामार्गावर जाणाऱ्या वाहनांनाही या प्रकल्पामुळे फायदा.
• जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होईल.
• गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून सुमारे २५ मिनिटे होईल.
• इंधन वापरात बचत, मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही (एक्यूआय) सुधारणा होईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीड विधानसभेवरून महायुतीत धूसफूस; एकाच जागेसाठी शिंदे गटासह अजित पवार गटाचाही दावा
बीड विधानसभेवरून महायुतीत धूसफूस; एकाच जागेसाठी शिंदे गटासह अजित पवार गटाचाही दावा
Nashik Rain Update : गोदामाईचा नारोशंकराला जलाभिषेक, नाशकात पावसाची संततधार कायम, दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत पाणी?
गोदामाईचा नारोशंकराला जलाभिषेक, नाशकात पावसाची संततधार कायम, दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत पाणी?
Telegram CEO Pavel Durov : टेलिग्रामचा संस्थापक फ्रान्समध्ये अटकेत; पावेल दुरोव आहे तरी कोण? फ्रान्स आणि रशिया आमनेसामने का आलेत??
टेलिग्रामचा संस्थापक फ्रान्समध्ये अटकेत; पावेल दुरोव आहे तरी कोण? फ्रान्स आणि रशिया आमनेसामने का आलेत??
भुमरेंच्या होमग्राऊंडमध्ये आदित्य ठाकरेंची तिरकस टोलेबाजी म्हणाले,
भुमरेंच्या होमग्राऊंडमध्ये आदित्य ठाकरेंची तिरकस टोलेबाजी म्हणाले, "गद्दारी केली,किती खोके धोके! वाईनची दुकानं.."
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 26 August 2024Vasant Chavan Death : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन; अशोक चव्हाणांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 02 PM : 26 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Kesarkar PC : शाळेत पॅनिक बटन देणार; कुणालाही वचवलं जाणार नाही, दीपक केसरकरांची ग्वाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीड विधानसभेवरून महायुतीत धूसफूस; एकाच जागेसाठी शिंदे गटासह अजित पवार गटाचाही दावा
बीड विधानसभेवरून महायुतीत धूसफूस; एकाच जागेसाठी शिंदे गटासह अजित पवार गटाचाही दावा
Nashik Rain Update : गोदामाईचा नारोशंकराला जलाभिषेक, नाशकात पावसाची संततधार कायम, दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत पाणी?
गोदामाईचा नारोशंकराला जलाभिषेक, नाशकात पावसाची संततधार कायम, दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत पाणी?
Telegram CEO Pavel Durov : टेलिग्रामचा संस्थापक फ्रान्समध्ये अटकेत; पावेल दुरोव आहे तरी कोण? फ्रान्स आणि रशिया आमनेसामने का आलेत??
टेलिग्रामचा संस्थापक फ्रान्समध्ये अटकेत; पावेल दुरोव आहे तरी कोण? फ्रान्स आणि रशिया आमनेसामने का आलेत??
भुमरेंच्या होमग्राऊंडमध्ये आदित्य ठाकरेंची तिरकस टोलेबाजी म्हणाले,
भुमरेंच्या होमग्राऊंडमध्ये आदित्य ठाकरेंची तिरकस टोलेबाजी म्हणाले, "गद्दारी केली,किती खोके धोके! वाईनची दुकानं.."
जिगरबाज... सर लवकर बरं व्हायचंय, त्यांना पकडायचंय; पुण्यातील जखमी पोलीस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा
जिगरबाज... सर लवकर बरं व्हायचंय, त्यांना पकडायचंय; पुण्यातील जखमी पोलीस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा
महिला सरपंचाकडून आत्मदहनाचा प्रयत्न,बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ओतलं पेट्रोल
महिला सरपंचाकडून आत्मदहनाचा प्रयत्न,बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ओतलं पेट्रोल
VIP Treatment In Jail : एका हातात ड्रिंक, दुसऱ्या हातात सिगारेट... हत्या प्रकरणातील आरोपी अभिनेत्याला व्हिआयपी ट्रिटमेंट
एका हातात ड्रिंक, दुसऱ्या हातात सिगारेट... हत्या प्रकरणातील आरोपी अभिनेत्याला व्हिआयपी ट्रिटमेंट
Vidhansabha Election 2024: रणजीतसिंह ते हर्षवर्धन, बापू पठारे ते मदन भोसले, 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत!
रणजीतसिंह ते हर्षवर्धन, बापू पठारे ते मदन भोसले, 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत!
Embed widget