एक्स्प्लोर
Advertisement
अभिनंदन... तीन वर्ष शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार चालवलं : राणे
'तीन वर्षे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार टिकवले आणि चालविले. त्यामुळे शिवसेनेला आता नाकच राहिले नाही. मुख्यमंत्र्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!'
मुंबई : एकीकडे नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा सुरु असताना दुसरीकडे राणेंनी खास आपल्या शैलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत शिवसेनेला डिवचलं आहे. फडणवीस सरकारला आज तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राणेंनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा देताना त्यांनी थेट शिवसेनेवरच निशाणा साधला.
राणेंनी नेमक्या काय शुभेच्छा दिल्या?
'देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षे यशस्वीरित्या सरकार चालविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! तीन वर्षे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार टिकवले आणि चालविले. त्यामुळे शिवसेनेला आता नाकच राहिले नाही. मुख्यमंत्र्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!' अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली.
नारायण राणेंच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन फोटो अपलोड करुन मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची तारीखही जाहीर करुन टाकली. 11 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळात राणेंचा समावेश होईल, अशी माहिती पाटलांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करायला लागेल अशी भूमिका घेत शिवसेनेनं भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, शिवसेनेच्या विरोध न जुमानता भाजपनं राणेंना मंत्रिमंडळात घेण्याचा विचार पक्का केल्याचं खात्रीलायक वृत्त समजतं आहे. संंबंधित बातम्या :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी तीन वर्ष यशस्वीरीत्या सरकार चालविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... @CMOMaharashtra pic.twitter.com/IDmitCf8yF
— Narayan Rane (@MeNarayanRane) October 31, 2017
राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश ठरला, खडसेंचं बघू : चंद्रकांत पाटील
भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : खडसे
राणेंना होणारा शिवसेनेचा विरोध निरर्थक : मुख्यमंत्री
ईडीनं आरोपपत्र दाखल केलेले राणे मंत्रिमंडळात का? : शिवसेना
नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशात शिवसेनेचा खोडा?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
क्रीडा
क्रिकेट
Advertisement