एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्यास उत्सुक नाही : सूत्र
वांद्रेच्या पोटनिवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर नारायण राणे आता विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सावध झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक लढवण्यास नारायण राणे इच्छुक नसल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.
मुंबई : नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. पण वांद्रेच्या पोटनिवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर नारायण राणे आता विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सावध झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक लढवण्यास नारायण राणे इच्छुक नसल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.
यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांची भेट होणार आहे. त्यानंतरच याबाबत नेमका निर्णय घेतला जाणार आहे.
राणेंना रोखण्यासाठी शिवसेना सुरुवातीपासूनच आक्रमक आहे. भाजपचं संख्याबळ अपुरं असल्यामुळे शिवसेना राणेंना दगाफटका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राणे पुन्हा एकदा धोका पत्करणार नसल्याचं समजतं आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजूनही चित्र स्पष्ट होत नसताना नारायण राणे यांच्या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. मात्र यात राणेंना दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राणेंविरोधात एकच उमेदवार देऊन त्याला इतर पक्षांनी पाठिंबा देण्याची रणनीती सुरु असल्याची चर्चा आहे.
भाजपने राणेंना पाठिंबा दिल्यास ते अपक्षांना सोबत घेऊ शकतात. तर तिकडे, विरोधकांनी म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जोडीला शिवसेनेने मोट बांधली, तर त्यांचं संख्याबळ 146 वर जाईल. तसं झाल्यास विरोधकांचा उमेदवार विधानपरिषदेच्या आमदारपदी येईल.
विधानसभेतील पक्षीय बलाबल :
- भाजप 122
- काँग्रेस– 42
- राष्ट्रवादी 41
- शिवसेना 63
- इतर 13
- अपक्ष 7
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement