एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नाणार प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनस्थळी जाण्यापासून पत्रकारांना रोखलं!

आंदोलकांशी संवाध साधणाऱ्या पत्रकारांना पोलीस हुसकावून लावत आहेत. त्यामुळे सरकारच्या या दडपशाहीचा जोरदार निषेध केला जात आहे.

मुंबई : नाणार प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी थेट विधानभवनात धडक दिली. विधानसभेच्या गॅलरीत चार प्रकल्पग्रस्तांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी या 4 प्रकल्पग्रस्तांना रोखत त्यांना ताब्यात घेतलं.

या आंदोलनकर्त्यांमध्ये 2 महिला आणि 2 पुरूषांचा समावेश आहे. रत्नागिरीतल्या राजापूर तालुक्यात नाणार रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा सरकार तिथल्या जमीनी अधिग्रहण करत आहे, मात्र शेतकऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला आहे.

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधात सुमारे दोन हजार आंदोलकांचं कालपासून (27 नोव्हेंबर) मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र आंदोलन मागे घेऊन परत जावी, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. तसंच प्रसार माध्यमांनाही आंदोलनस्थळी जाण्यास बंदी घातली आहे. आंदोलकांशी संवाध साधणाऱ्या पत्रकारांना पोलीस हुसकावून लावत आहेत. त्यामुळे सरकारच्या या दडपशाहीचा जोरदार निषेध केला जात आहे.

नाणार प्रकल्प होऊ नये, तसंच या प्रकल्पासाठी भूसंपादनाबाबत जारी केलेला अध्यादेश रद्द करा अशी या आंदोलकांची मागणी आहे.  नाणारवासियांचं बुधवारी (27 नोव्हेंबर) सकाळी दहा वाजल्यापासून आझाद मैदानात धरणं आंदोलन सुरु आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी अध्यादेश रद्द करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी पत्र लिहूनही निर्णय का झाला नाही, असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

नाणार प्रकल्प लादणार नाही : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री जोपर्यंत भेट देणार नाहीत तोपर्यंत धरण्यावरुन उठणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. तर दुसरीकडे रात्री दहा वाजेपर्यंत आंदोलन स्थगित न केल्यास आंदोलकांवर गुन्हे दाखल करावेत, असा आदेश सरकारने पोलिसांना दिल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

शिवाय एरव्ही नाणार प्रकल्पावरुन रान उठवणाऱ्या शिवसेनेचा एकही आमदार आंदोलकांची भेट घेण्यासाठी फिरकला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

ग्राऊंड झीरो रिपोर्ट : नाणार प्रकल्प काय आहे?

नाणार प्रकल्प

‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर  आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) चे राज्यमंत्री आणि एडनॉक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी धर्मेंद्र प्रधान आणि युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर झाला.

काय आहे नाणार प्रकल्प?

खनिज तेलावरचा प्रक्रिया उद्योग नाणार परिसरात उभारला जाणार आहे

जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी असेल, असा दावा सरकारतर्फे करण्यात येतोय

ही ग्रीन रिफायनरी असेल, असा दावाही सरकारतर्फे करण्यात आला आहे.

प्रति दिन 12 लाख बॅरल कच्च्या तेलावर या प्रकल्पात प्रक्रिया होईल

या रिफायनरीला वीजपुरवठा करण्यासाठी 2500 मेगावॅटचा औष्णिक विद्युत वीज प्रकल्प उभारण्यात येणार

रिफायनरीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी निःक्षारीकरण प्रकल्पाचीही उभारणी करण्यात येणार आहे.

नाणार प्रकल्पाला विरोध का?

रिफायनरी म्हणजे प्रदूषण हे साधं सरळ समीकरण जगभर आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांचं धाबं दणाणलं आहे. या प्रकल्पामुळे काही हजार कलमांचे मालक असलेले अनेक शेतकरी एका दिवसात भूमीहीन होणार आहेत. शेतकऱ्याचा तोंडचा घास तोंडातच अडकला आहे.

या प्रकल्पग्रस्त भागात जवळपास 12 लाख आंब्याची झाडं आहेत. तितकीच काजू आणि नारळाची झाडंही आहेत. त्याशिवाय काही हजार एकर भागात भातशेती होते.  याशिवाय नाचणी, वरी, कुळीथ, भाजीपाला याचंही उत्पन्न इथला शेतकरी दरवर्षी घेतो. इथल्या समृद्ध जंगलात वावडिंग, हरडा, चारोळे यांसारख्या अनेक औषधी वनस्पती सापडतात, त्यावर इथल्या भटक्या आणि आदिवासी समाजाचा उदरनिर्वाह चालतो.

माधव गाडगीळ समितीने या परिसरातील अनेक गावं ही इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित केली आहेत. हा प्रकल्प या गावात नसला तरी या प्रकल्पामुळे नैसर्गिदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशावर विपरित परिणाम होणार आहे. या रिफायनरीमुळे या गावांमधील पिण्याच्या पाण्यावरसुद्धा संकट उभं राहिलंय, अशी भीती गावकऱ्यांना वाटायला लागली आहे.

प्रस्तावित नाणार प्रकल्पाची वैशिष्ट्ये

जगातील सर्वात मोठा रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्रकल्प

जवळपास 2.90 लाख कोटी रुपयांची योजना

वर्षाला सहा कोटी टन उत्पादन करण्याची क्षमता

पहिली गुंतवणूकदार सौदी अरामको जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी

दुसरी गुंतवणूकदार एडनॉक अबूधाबीतील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी

भारतात एवढी मोठी गुंतवणूक कशामुळे? इतर तेल उत्पादक कंपन्यांप्रमाणेच एडनॉक आणि सौदी अरामकोलाही भारतात आपली पकड मजबूत करण्याची इच्छा आहे. भारत जगातील सर्वात मोठा तिसरा इंधनाची गरज असणारा देश असून एकूण गरजेपैकी 80 टक्के तेलाची आयात केली जाते. 2016-17 पर्यंत सौदी अरेबिया भारताचा सर्वात मोठा क्रूड ऑईल पुरवठादार देश होता, मात्र गेल्या वर्षी इराकने सौदीची जागा घेतली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget