मुंबईत शौचालयाचं दार ठोकल्याच्या वादातून एकाची हत्या
अंधेरीतील साकीनाका भागात शनिवारी दुपारी ही घटना घडली असून गणेश किर्लोस्कर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

मुंबई : शौचालयाचा दरवाजा ठोठावल्याच्या वादातून एकाची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील साकीनाका भागात शनिवारी दुपारी ही घटना घडली. गणेश किर्लोस्कर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
प्रविण गावडे हा सार्वजनिक शौचालयात गेला होता. दरम्यान एका मुलाने बाहेरून शौचालयाचा दरवाजा ठोठावण्यास सुरूवात केली. रागात बाहेर आलेल्या प्रविणने मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलाचे काका गणेश किर्लोस्कर त्याठिकाणी आले आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रविणने गणेश यांनाही धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, प्रविणने केलेल्या बेदम मारहाणीत गणेश किर्लोस्कर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी प्रविण गावडेला गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
काही महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे सार्वजनिक शौचालयाच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणात एकाची हत्या झाली होती. वडाळा पूर्व येथील संगमनगर भागातील घटनेत फुलचंद यादव यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी पोलिसांनी आरोपी शाकीर अलीला अटक केली होती. त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
