मुंबई : एकीकडे एसटी कर्मचारी आपल्या पगारासाठी, महागाई भत्त्यांसाठी आणि मागण्यांसाठी आक्रमक झालेले असताना तिकडे मुंबईच्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मात्र गोड बातमी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका या दिवाळीत बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दिवाळी बोनस देणार आहे. कर्मचाऱ्यांना पुढील तीन वर्ष 20 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना खुश करण्यात आले आहे.
सध्या मुंबई पालिकेत एक लाखांहून अधिक कर्मचारी आणि बेस्टचे 34 हजार कर्मचारी आहे. या निर्णयामुळे दिवाळी गोड होणार आहे. कोरोना संकटामुळे पालिकेलाही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान कोरोना परिस्थिती पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले आहे. यामुळे यंदाच्या दिवाळी पालिकेच्या सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला आहे.
महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे
- महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचारी, प्राथमिक शिक्षक : 20,000 रुपये
- माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित शाळा यातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते व शिक्षकेतर कर्मचारीः 10,000 रुपये
- प्राथमिक शिक्षण सेवक : 5600 रुपये
- आरोग्य सेविका : 5300 रुपये
- विनाअनुदानित माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षण सेवक : 2800 रुपये
Thane TMC : आर्थिक संकटात असलेल्या ठामपाच्या कर्मचाऱ्यांना 15,500 दिवाळी बोनस, महापौर नरेश म्हस्के यांनी केली घोषणा
कोरोना संसर्गाच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी मुंबई महानगरापालिका आणि बेस्टने महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. कठीण काळात महत्वपूर्ण कामगिरीमुळे पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटात पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण आहे. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केले आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आम्ही अधिकाधिक बोनस मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. गेल्या वर्षी 15 हजार 500 रुपये बोनस देण्यात आला होता.