Mumbai Drug Case : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोपांची मालिका सुरु केली आणि त्यानंतर त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. काशिफ खान यांचं नाव चर्चेत आलं. एफटीव्हीचे (फॅशन टीव्ही) इंडिया हेड असलेल्या काशिफ खान यांनी या आरोपांनंतर पहिली मुलाखत 'एबीपी माझा'ला दिली आहे. क्रूझवरील पार्टी काशिफ खान (Kashif Khan) यांनी आयोजित केली होती आणि समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर कारवाई होऊ दिली नाही, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला होता.  याशिवाय मलिक यांनी केलेल्या अन्य आरोपांवरही काशिफ खान यांनी माझाच्या मुलाखतीत उत्तरं दिली आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी सूरज ओझा यांनी काशिफ खान यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. 


फॅशन टीव्हीचं स्पष्टीकरण... 


कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण फॅशन टीव्हीनं दिलं आहे. क्रूझवर पार्टी आयोजित केली नव्हती, असं फॅशन टीव्हीनं म्हटलं आहे. क्रूझवरील कार्यक्रमाचे आपण फक्त टायटल स्पॉन्सर अर्थात प्रायोजक होतो, असं फॅशन टीव्हीकडून सांगण्यात आलं आहे. क्रूझवर आलेल्या लोकांशी फॅशन टीव्हीचा संबंध नसल्याचंही फॅशन टीव्हीकडून सांगण्यात आलं आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करु असंही फॅशन टीव्हीनं म्हटलं आहे. 


फॅशनच्या नावाने काशिफ खान पॉर्नचा धंदा करतो, नवाब मलिकांचा आरोप 


दाढीवाला काशिफ खान हा Fashion tv चा हेड आहे.  फॅशनच्या नावाने काशिफ खान पॉर्नचा धंदा करतो. तो समीर वानखेडेंचा मित्र आहे. काशिफ खानवर कारवाई करण्यापासून समीर वानखेडेंनी रोखलं असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी केला आहे. आता समीर वानखेडेंना भीती वाटू लागलीय, असंही ते म्हणाले. काल आर्यनला जामीन मिळताच "पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त", असे म्हणत ट्वीट करत नवाब मलिकांनी (Nawab Malik) सूचक इशारा दिला होता.


क्रांती रेडकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाल्या, मी बाळासाहेबांचा आदर्श घेऊन वाढलेली मुलगी, न्याय करा!


मलिक म्हणाले की, वानखेडेंकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षढयंत्र आहे. भाजप नेते या समीर वानखेडेंच्या पाठिशी उभे राहिले. भाजपचे मोठे मोठे नेते NCB कार्यालय जात आहेत. मी आज नावं घेत नाही, हिवाळी अधिवेशनात मी याबद्दल बोलणार आहे. काशिफ खानला अटक केल्यावर भाजपचं पितळ उघडं पडेल, असंही ते म्हणाले.