मुंबई : शेअर बाजारामध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे. शुक्रवारी मार्केट बंद होताना प्रमुख इक्विटी निर्देशांक घसरल्याचं दिसून आलं. एप्रिल नंतर शेअर मार्केट सातत्याने वधारत असलं तरी गेल्या दोन दिवसात त्यामध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. गुरुवारी शेअर मार्केटमध्ये दोन टक्क्यांची घसरण झाली होती. गुरुवारच्या घसरणीनंतर आजही शेअर मार्केटमध्ये घसरण झाली असून सेन्सेक्स 800 अंकानी घसरला आहे. निफ्टीमध्येही घसरण झाली असून तो 17,670 वर पोहोचला आहे. 


शेअर मार्केट तज्ज्ञांच्या मते, या वर्षी भारतातील प्रमुख स्टॉक इंडेक्समध्ये झालेली वाढ, प्रचंड तरलता आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या संख्येमध्ये ओव्हर व्हॅल्यूएशनची चिंता वाढली आहे. मॉर्गन स्टॅनलेने भारताला 'ओव्हरवेट' या श्रेणीतून 'इक्वल वेट' या श्रेणीत टाकलं आहे. संभाव्य अल्प-मुदतीच्या हेडविंड्सच्या पुढे बाजार मजबूत होईल अशी अपेक्षा आहे असंही म्हटलं आहे. 


जागतिक बाजारपेठेतील घसरलेला गुंतवणुकीचा दर आणि परकीय निधीच्या निर्गुंतवणूकीच्या प्रवाहात सातत्य या कारणांमुळे BSE सेन्सेक्स 800 अंकांनी घसरले आणि ते 59,104 वर आले. तर बेंचमार्क निफ्टी 200 अंकांनी घसरला आणि  17,613 वर स्थिर झाला. शेअर बाजारातील परकिय संस्थात्मक गुंतवणूक म्हणजे FII मध्ये वाढ झाल्याने बाजार काही प्रमाणात सावरल्याचं दिसून येतंय. 


निफ्टीचा विचार करता वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स, मिडकॅप आणि बँकांच्या शेअर्स घसरत असून ते रेड मार्क मध्ये आहेत. दुसरीकडे इंडसइंड बँक, बजाज, एल अॅन्ड टी, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी यांच्या शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं दिसून आलंय. 


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार करता गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यूएस ट्रेझरी उत्पादनात मोठी घट झाली असून अमेरिकन डॉलर एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतही चढ-उतार होत आहे. 


महत्वाच्या बातम्या :