एक्स्प्लोर
मुंब्य्रात बाळंतीण सुनेसह विहिणीची हत्या, सासू ताब्यात
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये एका महिलेने आपल्या सुनेसह तिच्या आईची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपी सासूला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुनेच्या हत्येमुळे अवघ्या 40 दिवसांच्या बाळाचं मातृत्व हरपलं आहे.
मुंब्य्रातील शिमला पार्कमधील सहयोग बिल्डिंगमध्ये हे हत्याकांड घडल्याचं वृत्त आहे. सासूने सून आणि सुनेच्या आईची म्हणजेच विहिणीला शीतपेयातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर दोघींची गळा कापून हत्या केली.
मुंब्रा पोलिसांनी केला हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी सासूला ताब्यात घेतलं आहे. मृत सुनेला 40 दिवसांचं बाळ असून हुंड्यासाठी सासू सुनेचा छळ करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान मुंब्रा पोलिस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
भारत
व्यापार-उद्योग
बातम्या
Advertisement