एक्स्प्लोर
लोकलच्या छतावरुन प्रवास, ओव्हरहेड वायरच्या स्पर्शाने तरुण भाजला
मुंबई : अतिउत्साहाच्या भरात लोकल ट्रेनवर चढल्याने एका तरुण ओव्हरहेड वायरचा धक्का लागून 65 टक्के भाजला आहे. लोकलच्या हार्बर मार्गावरील टिळकनगर स्टेशनवर रविवारी संध्याकाळी सहा वाजता ही दुर्घटना घडली.
कुर्ल्याहून गोवंडीला घरी जाण्यासाठी अब्दुल अन्सारीने पनवेल लोकल पकडली. मात्र लोकलमध्ये न बसता त्याने थेट छतावर मुक्काम ठोकला. लोकल टिळकनगरच्या दरम्यान आली असता 25 हजार व्होल्टेजच्या ओव्हरहेड वायरला अब्दुलचा स्पर्श झाला. त्यामुळे तो 65 टक्के भाजला. यानंतर रेल्वे प्रशासनाने त्याला रुग्णालयात दाखल केलं.
त्यानंतर इतर प्रवासी लोकलमधून तातडीने उड्या मारुन बाहेर आले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
विशेष म्हणजे छतावर चढू नका अशा सूचना रेल्वे वारंवार देत असूनही तरुण नसत्या धाडसापायी रेल्वेच्या छतावर चढतात आणि अपघाताला आमंत्रण देतात.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement