एक्स्प्लोर
चार्जिंग करताना फोन उचलल्याने शॉक, मुंबईत तरुणाचा मृत्यू
चार्जिंगला लावलेला असताना फोन आल्यामुळे तरुणाने तसाच फोन उचलला. मात्र विजेचा जोरदार धक्का बसून तो जागेवरच कोसळला.
![चार्जिंग करताना फोन उचलल्याने शॉक, मुंबईत तरुणाचा मृत्यू Mumbai Youth Dies After Picking Up Mobile Phone Put On Charging Latest Update चार्जिंग करताना फोन उचलल्याने शॉक, मुंबईत तरुणाचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31101551/mobile-phone-881x4001.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Smart Phone
मुंबई : मोबाईल चार्ज होत असताना फोनवर बोलणं मुंबईतील तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. मोबाइल चार्जिंगला लावून बोलताना फोनचा स्फोट झाल्याच्या घटना आतापर्यंत पाहायला मिळाल्या आहेत. मात्र चार्जिंग सुरु असताना फोन उचलल्याने 28 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
बुधवारी तपनचा मित्र त्याच्या घरी आला होता. त्यावेळी तपनने त्याचा फोन चार्जिंगला लावला होता. तितक्यात एक फोन आल्यामुळे त्याने चार्जिंगला लावलेला असतानाच फोन उचलला. मात्र विजेचा जोरदार धक्का बसून तपन जागेवरच कोसळला.
तपनच्या घाबरलेल्या मित्राने आरडाओरड करुन शेजाऱ्यांना बोलवलं. तपनला तातडीने जवळच्या भाभा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला तपन वांद्र्यातील शास्त्रीनगर लेन नं 1 मध्ये राहायचा. तो फुलांचे डिझाईन बनवण्याचे काम करत असे.
या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या प्रकारामुळे तपनच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी तपनचा मोबाईल ताब्यात घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)