एक्स्प्लोर
Advertisement
गणेशाला मूर्तरुप देणारे हात हरपले, विजय खातूंचं निधन
गणेशाची विविध रुपं साकारणारे प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांचं निधन झालं
मुंबई : प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. दादरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय खातू 63 वर्षांचे होते.
खातू यांनी साकारलेल्या गणेशमूर्ती फक्त महाराष्ट्रच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. खातू यांचा मुंबईत परेल वर्कशॉपजवळ गणपती मूर्तींचा कारखाना आहे. गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर आला असल्यामुळे खातू यांच्या कारखान्यात गणेशमूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं होतं. दादरमधील निवासस्थानीच हार्ट अटॅकमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या 40 वर्षांत त्यांनी 250 पेक्षा जास्त 25 फुटांहून जास्त उंचीच्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिकमधील भाविकांकडे त्यांनी साकारलेल्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा होते.
वडील रामकृष्ण खातू यांच्याकडून विजय खातूंनी गणेशमूर्ती साकारण्याचा वसा घेतला. पर्यावरण विषयक जागृतीमुळे खातू यांनी लालबाग-परळमधील कारखान्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून शाडूच्या मातींची निवड केली.
चंदनवाडी, खेतवाडी, तुलसीवाडी, चिराबाझार, गणेशगल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी, वसईचा महाराजा यासारख्या गणेशमूर्ती खातू तयार करत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
अकोला
राजकारण
Advertisement