(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prakash Ambedkar : 'ओबीसी आरक्षण आम्हीच मिळवून दिलं', संविधान सन्मान महासभेतून प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
Prakash Ambedkar : मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या संविधान सन्मान महासभेतून प्रकाश आंबेडकरांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर देखील निशाणा साधलाय.
मुंबई : शनिवार 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aaghadi) संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलं. या महासभेतून प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) छगन भुजबळांवर निशाणा साधला. ओबीसींना आरक्षण आम्हीच मिळवून दिलं, असं म्हणत छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसेच त्यांनी त्यांच्या भाषणातून इतर अनेक मुद्द्यावरही भाष्य केलं.
सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर वातवारण चांगलच तापल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झालाय. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये टीकांचं शीतयुद्ध देखील सुरुये. या संपूर्ण घटनाक्रमावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संविधान सन्मान महासभेतून भाष्य केलं आहे.
आरक्षण वाचवचा येत नाही म्हणून हे सर्व - प्रकाश आंबेडकर
सध्या राज्यात आरक्षणावरुन वाद निर्माण झालाय. पण ओबीसी नेत्यांनी कृपा करुन माझ्या नादाला लागू नये. तुमचा इतिहास काढला तर तुम्ही मंडल बरोबर होता की कमंडल बरोबर होता हे स्पष्ट होईल. मग ते छगन भुजबळ असो किंवा शेंडगे असोत. आता तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवता येत नाही, म्हणून हे सर्व सुरु आहे. ओबीसी लढा आम्ही देत होतो तो ओबासी कमोंडल सोबत होता. पण ओबीसीचं आरक्षण आम्हीच मिळवून दिलं असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी म्हटलं.
'आरक्षणाच्या नावाखाली समाजामध्ये तेढ निर्माण केला जातोय'
सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे राज्याचं वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर पेटलं असल्याचं पाहायला मिळतंय. यावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरक्षणाच्या नावाने समाजासमाजामध्ये एकमेकांना भिडवलं जातंय. गोध्रा झालं, आसाम झालं आणि आता 3 डिसेंबर नंतर काही तरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच तुम्हाला सावध करतोय.
'मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या ताट वेगळं असावं'
आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांनी त्यांची भूमिका देखील स्पष्ट केलीये. ओबीसी आणि मराठा समाजाचं आरक्षणाच्या बाबतीत ताट वेगळं असावं, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी केलीये. दरम्यान यावेळी त्यांनी जरांगे पाटलांना देखील सल्ला दिल्याचं पाहायला मिळतंय. जरांगे पाटील यांना एकच सांगतो, सोनिया गांधी यांनी गुजरातमध्ये मौत का सौदा हा शब्द वापरला होता. त्या एका वाक्याने काँग्रेसचं येणारं सरकार गेलं. जरांगे पाटलांनी तीच चुक करु नये.
तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही - प्रकाश आंबेडकर
जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत बसलाय तोपर्यंत रयतेच्या मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे जरांगे पाटलांनी ही चूक करु नये. ही लढाई लढत राहावी लागणार आहे. मात्र ही लढाई लढताना देशविघातक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.
हेही वाचा :
Prakash Shedge : मागासवर्ग आयोगाकडून होणारे सर्वेक्षण ताबडतोब थांबवा; प्रकाश शेंडगेंची मागणी