एक्स्प्लोर
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेली सिनेटची बैठक रद्द
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेली सिनेटची बैठक रद्द करण्यात आली आहे. राज्यपालांनी या बैठकीला परवानगी नाकारल्यामुळे बैठक रद्द झाली आहे. काल रविवार असतानाही कुलगुरुंनी अकॅडमीक कौन्सिल, मॅनेजमेंट कौन्सिल आणि सिनेटची बैठक बोलावली होती. मात्र काल या बैठका रद्द झाल्यामुळे आज या बैठका घेण्यात येणार होत्या.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेली सिनेटची बैठक रद्द करण्यात आली आहे. राज्यपालांनी या बैठकीला परवानगी नाकारल्यामुळे बैठक रद्द झाली आहे. काल रविवार असतानाही कुलगुरुंनी अकॅडमीक कौन्सिल, मॅनेजमेंट कौन्सिल आणि सिनेटची बैठक बोलावली होती. मात्र काल या बैठका रद्द झाल्यामुळे आज या बैठका घेण्यात येणार होत्या.
आज 31 जुलै रोजी बृहत आराखडा सादर करण्याची आज शेवटची मुदत होती. यासाठी सिनेटची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीला राज्यपाल परवानगी देणार का यावर सर्वांचं लक्ष होतं. मात्र आता या बैठकीला राज्यपालांनी परवानगी नाकारल्याची सुत्रांची माहिती आहे.
मुंबई विद्यापीठात सिनेटची बैठक घेण्यासाठी राज्यपालांच्या कार्यालयातून परवानगीची आवश्यकता असते. बैठकीच्या परवानगीसाठी राज्यपालांच्या कार्यालयाला बृहत आराखड्याचा मसुदा पाठवावा लागतो. मात्र, हा बृहत आराखडा राज्यपालांकडे पाठवला गेलेला नाही. त्यामुळे राज्यपालकडून मंजुरी मिळालेली नाही असं सुत्रांनी सांगितलं.
दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेल्या 4 बैठकांपैकी 3 बैठका काल रद्द झाल्या आहेत. सिनेटची परवानगी न मिळाल्यानं या बैठका रद्द झाल्या होत्या.
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेल्या 4 पैकी 3 बैठका रद्द
काल रविवार असला तरीही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी अकॅडमीक काऊन्सिल, मॅनेजमेंट काऊन्सिल, प्रॉस्पेक्टिव्ह प्लान आणि सिनेटची बैठक बोलवली होती. त्यापैकी मॅनेजमेंट काऊन्सिल, सिनेट आणि अकॅडमीक काऊन्सिलची कोरम अभावी बैठक रद्द झाली होती.
मुंबई विद्यापीठाचे निकाल लागण्याची डेडलाईन संपायला आता काही तास उरले आहेत, मात्र शिक्षणमंत्र्याच्या आश्वासनानुसार आज निकाल लागतील असं चित्र दिसत नाही. विद्यापीठाच्या 3 लाख उत्तरपत्रिका तपासणं अद्याप बाकी आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे 153 निकाल जाहीर
दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे 153 निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. तसंच उर्वरित विविध शाखांचे 55 निकाल लवकरच जाहीर केले जातील असं विद्यापीठानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. 17 लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांपैकी जवळपास 90 टक्के उत्तरपत्रिकांचं मुल्यांकन झाल्याचंही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement