एक्स्प्लोर
ईद-गणेशोत्सवामुळे निकाल रखडला, मुंबई विद्यापीठाचा दावा
सहा डेडलाईन पाळण्यात अपयशी ठरणाऱ्या मुंबई विद्यापीठानं निकालाची 19 सप्टेंबर ही सातवी डेडलाईन दिली आहे.

मुंबई : एकीकडे निकाल रखडल्यामुळे मुंबई विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. मात्र मुंबई विद्यापीठानं बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचा अजब दावा मुंबई हायकोर्टात केला आहे. विद्यापीठ प्रशासनानं उच्च न्यायालयात हास्यास्पद कारणं देण्याची मालिकाच सुरु केली आहे. गेल्या वेळी मुंबईतल्या पावसावर खापर फोडल्यानंतर यावेळी मुंबई विद्यापीठानं बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं उच्च न्यायालयाला सांगितलं. या आधी सहा डेडलाईन पाळण्यात अपयशी ठरणाऱ्या मुंबई विद्यापीठानं निकालाची 19 सप्टेंबर ही सातवी डेडलाईन दिली आहे. उच्च न्यायालयानं डेडलाईन आणि निकालासंदर्भातली माहिती लिखीत स्वरुपात देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई विद्यापीठाकडून 14 अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यात आलेले नाहीत. मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे उपनगरात अनेक ठिकाणी वीज गेली होती आणि त्यामुळे पेपर तपासणीचं काम पूर्ण करता आलं नाही, असा दावा विद्यापीठातर्फे मागच्या वेळी करण्यात आला होता.
संबंधित बातम्या
पाऊस आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडला, मुंबई विद्यापीठाचा अजब दावा
मुंबई विद्यापीठाविरोधात तीन विद्यार्थ्यांचा 10 लाखांचा दावा
मुंबई विद्यापीठ पेपर तपासण्यासाठी सीएंची मदत घेणार
आणखी वाचा






















