एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; परीक्षेच्या यशस्वी आयोजनसाठी तज्ज्ञांची समिती

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेच्या यशस्वी आयोजनसाठी तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या अंतिम वर्ष/सत्राच्या परीक्षा आजपासून सुरु झाल्या. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील विद्यार्थी या परीक्षांना प्रविष्ठ झाले होते. चारही विद्याशाखेअंतर्गत विविध अभ्यासक्रम आणि विषयांच्या परीक्षा आज सुरळीत पार पडल्या. अत्यंत सुलभ अशा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यापीठाने आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात परीक्षा घेतल्या.

परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना नमूना प्रश्न पत्र व त्यांच्या सराव परीक्षाही घेण्यात आल्या आहेत. काही विषयांच्या सराव परीक्षा अजूनही घेतल्या जाणार आहेत. काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव एखादा विद्यार्थी परीक्षेला बसू शकला नसेल अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

राज्यातील विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लेखी आश्वासन

परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी तज्ज्ञांची समिती

बॅकलॉग आणि नियमित परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे 94 समुह तयार केले आहेत. दरदिवशीच्या परीक्षांविषयक घडामोडी आणि अनुषंगिक बाबींसाठी विद्यापीठाने कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षण समिती तयार केली असून या समितीमध्ये प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह सर्व अधिष्ठाता, सहाय्यक अधिष्ठाता, जिल्हानिहाय समन्वयक, प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांना प्रविष्ठ असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालये विशेष प्रयत्न करीत आहेत. आज पार पडलेल्या परीक्षांना समुह महाविद्यालयांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार परीक्षांचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याचेही डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

अंतिम वर्ष/सत्राच्या परीक्षांना प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना प्रथमच ऑनलाईन माध्यमातून परीक्षा द्याव्या लागत असल्याने अशा विद्यार्थ्यांच्या असलेल्या काही समस्या, अडचणी आणि शंकाचे निरसन व्हावे यासाठी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील महाविद्यालयातील सुमारे 5 हजाराहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले.

Last Year Exam|शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन;'या' विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

महत्त्वाच्या बातम्या

मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार, आठवड्यातील चार दिवस विमानसेवा उपलब्ध 
सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार, आठवड्यातील चार दिवस विमानसेवा उपलब्ध 
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
बेकायदेशीर स्कूल व्हॅन प्रकरण! एसबीओएकडून परिवहन विभागाविरोधात याचिका दाखल, नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा 
बेकायदेशीर स्कूल व्हॅन प्रकरण! एसबीओएकडून परिवहन विभागाविरोधात याचिका दाखल, नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा 

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget