एक्स्प्लोर
मुंबईतील घरात वृद्धेचा सांगाडा प्रकरणात नवा ट्विस्ट
पोलिसांनी महिलेच्या डायरीतील अक्षराशी चिठ्ठीतील हस्ताक्षर जुळवून पाहिलं आहे. फॉरेन्सिक टीम आणि फिंगर प्रिंट टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.
मुंबई : मुंबईतल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये वृद्धेचा सांगाडा आढळल्याच्या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. महिलेच्या घरात पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये, असं त्यात लिहिल्याची माहिती आहे.
रविवारी आशा साहनी यांचा मुलगा ऋतुराज अमेरिकेहून परतला. बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे दार तोडण्यात आलं. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. आत शिरताच आशा यांच्या मृतदेहाचा सांगाडा दिसला. त्यानंतर पोलिसांनी घरात केलेल्या तपासात सुसाईड नोट सापडली आहे.
पोलिसांनी महिलेच्या डायरीतील अक्षराशी चिठ्ठीतील हस्ताक्षर जुळवून पाहिलं आहे. फॉरेन्सिक टीम आणि फिंगर प्रिंट टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.
परदेशातून मुलगा मुंबईत परतला, घरात आईचा सांगाडा
ऋतुराज साहनी हे आयटी इंजिनिअर आहेत. नोकरीनिमित्त ते पत्नी आणि मुलासह अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. अंधेरीतल्या ओशिवारा भागातील बेल स्कॉट टॉवरच्या दहाव्या मजल्यावर साहनी कुटुंबाचा फ्लॅट आहे. घरात ऋतुराज यांच्या 63 वर्षीय मातोश्री आशा केदार साहनी एकट्याच राहायच्या. ऋतुराज यांनी आईचा सांभाळ करण्यासाठी कुठलाही केअर टेकर किंवा घरकामाला नोकर-चाकर ठेवला नव्हता. त्यामुळे आशा यांनाच सगळी कामं करावी लागत. धक्कादायक म्हणजे ऋतुराज आणि आशा यांच्यातील अखेरचं बोलणं मे 2016 मध्ये म्हणजे तब्बल सव्वा वर्षांपूर्वी झालं होतं. सोसायटीच्या वॉचमनने दिलेल्या माहितीनुसार ऋतुराज गेल्या काही वर्षांत कधी मुंबईत फिरकले नाहीत. आशा साहनीही फारशा घराबाहेर पडत नसत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement