एक्स्प्लोर

चिमुकल्याचा खोकला तीन महिने थांबेना, सर्व उपचार केले, तीन महिन्यांनी कळलं LED बल्ब गिळला, यशस्वी शस्त्रक्रिया

खेळण्यांच्या गाडीतून गिळलेला एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला आणि मुलाच्या फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत करण्यात आले.

Mumbai: तब्बल तीन महिने सतत खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने चिंतेत सापडलेल्या पालकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. तपासणीनंतर कळलं की, साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याने खेळण्यातला धातूचा LED बल्ब गिळला होता. अखेर जसलोक हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मिनी थोरॅकोटॉमी शस्त्रक्रियेच्या मदतीने हा बल्ब काढून मुलाचे प्राण वाचवले.

लईडी बल्ब यशस्वीरित्या काढून टाकला 

एका दुर्मिळ व असाधारण वैद्यकीय केसमध्‍ये जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात अडकलेला धातूचा एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढला, ज्यामुळे तीन महिन्‍यांपासून त्‍याला सतत खोकला आणि श्‍वसनाचा होत असलेला त्रास अखेर दूर झाला. राहुल (गोपनीयतेसाठी नाव बदलले आहे) सुरुवातीला निदान झालेल्या न्‍यूमोनिया आजाराने ग्रस्त होता आणि अँटीबायोटिक्सचे अनेक औषधोपचार करण्‍यात आले. मोठ्या प्रमाणात काळजी घेतल्यानंतर देखील, त्याची लक्षणे कायम राहिली, ज्यामुळे त्‍याची प्रगत तपासणी करण्‍यात आली, ज्यामध्ये सीटी स्कॅन करण्‍यात आले. यामधून त्‍याच्‍या डाव्या ब्रोन्कसमध्ये खोलवर धातूचा भाग असल्याचे आढळून आले. कोल्हापूरात फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपीच्या अयशस्वी प्रयत्‍नांनंतर मुलाला जसलोक हॉस्पिटलमध्‍ये आणण्‍यात आले, जेथे ब्रॉन्कोस्कोपीमध्ये गिळण्‍यात आलेला एलईडी बल्‍ब ब्रोन्कस मध्ये आढळून आला. त्यानंतर डॉ. विमेश राजपूत आणि डॉ. दिव्य प्रभात यांनी मिनी थोरॅकोटॉमी (४ सेमी कट) केली, ज्यामुळे खेळण्यांच्या गाडीतून गिळलेला एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला आणि मुलाच्या फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत करण्यात आले.

डॉक्टरांचे मत काय?

अॅनेस्थेसियोलॉजी सल्लागार डॉ. अनुराग जैन यांनी या शस्त्रक्रियेला मोठे सहकार्य केले. या केसबाबत मत व्‍यक्‍त करत जसलोक हॉस्पिटलमधील थोरॅसिस सर्जन डॉ. विमेश राजपूत म्‍हणाले, “आम्‍ही ऑपरेट केलेली ही सर्वात दुर्मिळ केस होती. एलईडी बल्ब फुफ्फुसामध्‍ये खोलवर गेला होता आणि समकालीन उपचार पद्धती तो बल्‍ब बाहेर काढण्‍यामध्‍ये अयशस्‍वी ठरल्‍या. काळजीपूर्वक नियोजन केलेल्या मिनी थोरॅकोटॉमीसह आम्‍ही सुरक्षितपणे एलईडी बल्‍ब बाहेर काढला आणि मुलाला जीवनदान मिळाले.'' ईएनटी सर्जन डॉ. दिव्य प्रभात म्‍हणाल्‍या, “मुलांमध्ये अस्पष्ट आणि सतत दिसणाऱ्या श्‍वसनसंबंधित लक्षणाकडे कधीही दुर्लक्ष करू नये. यामुळे अनेकदा न्यूमोनिया किंवा इतर सामान्य आजारांमुळे अशा केसचे निदान होण्यास विलंब होतो. प्रगत इमेजिंगद्वारे लवकर निदान केल्यास परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते आणि गुंतागूंत टाळता येऊ शकते.''

आरव आता मोकळा श्‍वास घेतोय...

जागरूकतेच्‍या महत्त्वावर भर देत चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्‍हणाले, “मुलांनी एखादी वस्‍तू गिळणे हे पालकांच्‍या लक्षात न येणे स्‍वाभाविक आहे. वेळेवर वैद्यकीय लक्ष आणि स्‍पेशलिस्‍ट हस्‍तक्षेप फुफ्फुसाचे दीर्घकालीन नुकसान होण्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. ही केस पालकांना व आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांना मुलांमध्‍ये गंभीर, अनिश्चित श्‍वसनसंबंधित समस्‍या आढळून आल्‍यास दक्ष राहण्‍याची आठवण करून देते.''

आभार व्यक्‍त करत, मुलाचे वडील अविनाश पाटील म्हणाले, ''आम्हाला किती दिलासा मिळाला आहे ते शब्दात सांगता येऊ शकत नाही. तीन महिने आम्ही सतत भीतीच्‍या वातावरणात जगत होतो, आमच्या मुलाला काय झाले आहे हे आम्हाला कळत नव्हते. जसलोक हॉस्पिटलमधील अविश्वसनीय टीमचे आभार, आरव आता मोकळा श्‍वास घेत आहे आणि पुन्हा हसत आहे. या हॉस्पिटलने आमच्या मुलाला नवीन जीवन दिले आहे आणि आम्ही नेहमी त्‍यांचे आभारी राहू.'' या केसमधून मुलांमुधील गुंतागूंतीच्‍या श्‍वसनसंबंधित केसेसचे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये लवकर निदान, प्रगत इमेजिंग आणि स्‍पेशलिस्‍ट हस्‍तक्षेपाचे महत्त्व दिसून येते. जसलोक हॉस्पिटलने रूग्‍ण केअरमधील सर्वोत्तमता आणि प्रगत शस्त्रक्रिया कौशल्‍यासाठी आपली प्रतिष्‍ठा कायम ठेवली आहे, ज्‍यामधून सर्वात आव्‍हानात्‍मक केसेसमध्‍ये देखील यशस्‍वी निष्‍पत्तींची खात्री मिळते.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम

व्हिडीओ

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
Embed widget