मुंबईसोबतच ठाण्याचाही पारा वाढला, या वर्षातील विक्रमी तापमानाची नोंद; कुठं किती तापमानाची नोंद?
मुंबईत (Mumbai) उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळं मुंबईकरांची काहीली होत आहे. काल (20 मार्च) मुंबईत 2024 या वर्षातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली आहे.
Mumbai Temperature News : दिवसेंदिवस राज्यातील तापमानात (Temperature) वाढ होताना दिसत आहे. मुंबईतही (Mumbai) उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळं मुंबईकरांची काहीली होत आहे. दरम्यान, काल (20 मार्च) मुंबईत 2024 या वर्षातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली आहे. काल मुंबईतील तापमानाचा पारा हा 37.07 अंश सेल्सिअसवर गेला होता. पुढील दोन ते तीन दिवसात मुंबईत तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईसोबतच ठाणे तापलं
राज्यात फन्हाचा चटका चांगला वाढल्याचे दिसत आहे. मुंबईत तापमानाचा पारा 37 अंशावर गेला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मुंबईतील तापमान 40 अंश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल कुलाब्यात कमाल तापमान 34.3 अंश सेल्सिअस होते. मुंबईसोबतच ठाणे देखील तापलं होतं. ठाण्यातील कमाल तापमान 38.04 अंश सेल्सिअस होते. सर्वसाधारणपणे मुंबईतील कमाल तापमान मार्च महिन्यात 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास जाताना दिसत असते, तसं यंदा देखील अनुभवायला मिळत आहे.
मुंबईत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता
पूर्वेकडील प्रवाहामुळं पुढील काही दिवस मुंबईत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात सध्या गुजरातवर अँटीसायक्लोनची निर्मिती होत आहे. यामुळं पश्चिम ऐवजी पूर्व बाजूनं वाऱ्यांचा वेग दिसत आहे. ज्यामुळं तापमानात वाढ दिसत असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे.