एक्स्प्लोर
बुचर बेटावरील इंधनाच्या टाकीला लागलेली आग धुमसतीच
मुंबईच्या समुद्रामध्ये अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बुचर आयलंड इथे तेल शुद्धीकरण केंद्र आहे.
मुंबई : मुंबईजवळील बुचर बेटावरच्या इंधनाच्या टाकीला लागलेली आग अजूनही धुमसत आहे. 12 तासांपासून आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.
मुंबईच्या समुद्रामध्ये अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बुचर आयलंड इथे तेल शुद्धीकरण केंद्र आहे. काल (शुक्रवार) दुपारी चार-पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याच वेळी, बुचर आयलंडवरील जवाहर द्वीप इथल्या पेट्रोल आणि डिझेलचा साठा करणाऱ्या टाकीला अचानक आग लागली.
मुंबईजवळच्या बुचर बेटावरच्या इंधनाच्या टाकीला आग
आग आता पसरत नसली तरी ती पूर्ण विझलेली नाही. आग लागलेल्या मुख्य टाकीपर्यंत पोहोचण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याचं मुंबई अग्नीशमन दलाच्या प्रमुखांनी सांगितलं.
दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण वीज पडल्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येतेआहे. आगीमध्ये नेमकं किती नुकसान झालं आहे याचंही माहिती मिळू शकलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement