एक्स्प्लोर
Advertisement
निवडणुकांच्या तोंडावर मुंबईत विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर येत्या काही दिवसात मुंबईत विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरु होणार आहे. त्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.
प्रकल्पांच्या यादीमध्ये प्रस्तावित सागरी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल आणि बांद्रा ते विरार या लोकल मार्गाचा एलिव्हेटड कॉरिडॉर, अरबी समुद्रातले महत्त्वाकांक्षी शिवस्मारक आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा समावेश आहे.
इतकंच नाही, तर मुंबईभरात 500 वायफाय सेंटर सुरु करण्याच्या कामाचं उद्घाटनही नोव्हेंबरमध्येच होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या कामांचं उद्घाटन करून भाजप मतदारांना आकर्षित करणार आहे, तर हेच प्रकल्प 2019 पर्यंत कार्यान्वित करुन त्याचा फायदा पुढच्या विधानसभा निवडणुकीतही घेण्याचा प्रयत्न भाजपचा असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement