एक्स्प्लोर
98 टक्के मिळवत सायन्स टॉपर, वाहनचोरी प्रकरणी अटक
मुंबई : व्यसनामुळे एका हुशार विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य कशाप्रकारे उद्धवस्त होतं हे मुंबईतील एका उदाहरणाने समोर आलं आहे. गेल्या वर्षी 98 टक्के गुण मिळवून सायन्स टॉपर ठरलेल्या जयकिशन सिंगला वाहनचोरी प्रकरणात अटक झाली आहे.
ड्रग्जच्या व्यसनामुळे जयकिशनने वाहनांची चोरी सुरु केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयकिशन हा दुचाकींची चोरी करायचा आणि त्यांची ओएलएक्सवर विक्री करायचा. अखेर अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली.
जयकिशन हा महाराष्ट्रातील बारावीच्या सायन्स टॉपरपैकी एक असून त्याला 2015-16 मध्ये बोर्डाच्या परीक्षेत 98.50% गुण मिळाल्याचा दावा, त्याच्या पालकांनी केला आहे.
जयकिशन ओमप्रकाश सिंग अंधेरी पूर्वच्या मालपाडोंगरी परिसरात कुटुंबासोबत राहतो. त्याचे वडील व्यवसायाने डॉक्टर आहेत.
गाडी चोरुन ती निर्जनस्थळी ठेवायची. त्यानंतर त्याचा फोटो काढून तो ‘ओएलएक्स’वर शेअर करायचा आणि ती विकायची, अशी त्याची कार्यपद्धती असल्याचं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
सहा महिन्यांपूर्वीही जयकिशनला वाहनचोरीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याने एमआयडीसी परिसरातून एक मोटरसायकल चोरुन तिची जाहिरात ‘ओएलएक्स’ वर टाकली. ती मोटारसायकलच्या मालकाने पाहून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानंतरही बटन नावाच्या ड्रग्जचं व्यसन जडल्यामुळे त्यानं वाहनचोरीचा सपाटा सुरुच ठेवला आणि तो पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement