एक्स्प्लोर
अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, रिअॅलिटी शो स्पर्धक अटकेत
अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मुंबईत रिअॅलिटी शो स्पर्धकाला अटक करण्यात आली आहे

मुंबई : अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मुंबईत रिअॅलिटी शो स्पर्धकाला अटक करण्यात आली आहे. 20 वर्षीय आदित्य गुप्ताला नालासोपारामधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
17 वर्षीय तरुणीचं अपहरण करुन तिला खाण्यातून गुंगीचं औषध दिलं आणि नालासोपाऱ्यातील राहत्या घरी तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आदित्यवर आहे. आदित्यने एका टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता.
आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तरुणीच्या पालकांनी अंधेरीतील डी एन नगर पोलिसात रविवारी केली होती. त्यानंतर अंधेरीतील मॅकडॉनाल्डमध्ये तरुणी सापडली होती. भाभा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर तरुणीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं.
इन्स्टाग्रामवरुन आपली आदित्यशी ओळख झाल्याची माहिती, पीडितेने पोलिसांना दिली. 'आदित्यने रविवारी मला मॅकडोनाल्डमध्ये भेटायला बोलावलं. त्यानंतर तो मला नालासोपाऱ्यातील घरी घेऊन गेला. खाण्यातून त्याने मला गुंगीचं औषध दिलं आणि बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा ट्रेनने अंधेरीला आणून सोडलं' असा आरोप तिने केला आहे.
कॉल डेटा रेकॉर्ड्स आणि सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून शहर गुन्हे शाखेच्या युनिट नऊने आदित्यला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला डी एन नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून त्याच्यावर पोक्सो कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
