एक्स्प्लोर
मुंबईत कुठे कुठे जेवण-खाणे आणि राहण्याची सोय?
मात्र अशा आणीबाणीच्या परिस्थितीत मुंबईकरांनी एकमेकांना साथ देत खाण्या-पिण्याची तसंच राहण्याची सोय केली आहे.

मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या तुफान लोकांचा दिवस पाण्यात गेला आहे. शहरात अवघ्या सहा तासात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला असून पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसामुळे घरी जाण्याची सोय नसल्याने अनेक जण स्टेशन, रस्त्यांवर तसंच कार्यालयातच अडकले आहेत. मात्र अशा आणीबाणीच्या परिस्थितीत मुंबईकरांनी एकमेकांना साथ देत खाण्या-पिण्याची तसंच राहण्याची सोय केली आहे. सिद्धीविनायक मंदिराकडून पावसात अडकलेल्यांची मंदिरात राहण्याची सोय केल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे. तर लालबागचा राजा मंडळाकडून पावसात अडकलेल्यांची जेवण-खाण्याची सोय करण्यात आली आहे. मुंबईत कुठे कुठे जेवण-खाण्याची आणि राहण्याची सोय दादर, प्रभादेवी : सिद्धीविनायक मंदिर अंधेरी : अंधेरी स्पोर्ट्स कॉम्लेक्स मुलुंड : कालिदास नाट्यगृह सीएसएमटी : बाई काबीबाई शाळा ताडदेव : तुलसीवाडी गणेशोत्सव मंडळ मंडप दादर, माटुंगा, सायन, परेल : जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव, वडाळा. श्री हरजी बोजराज अँड सन्स. के व्ही ओ जैन छत्रालय श्रद्धानंद आश्रम रोड, माटुंगा सायन/दादर : शगुन हॉल, लक्ष्मी नारायण लेन, माटुंगा. दादर गुरुद्वारा, चित्रा सिनेमासमोर माटुंगा : एचएनआर टेक प्रायव्हेट लिमिटेड, पहिला मजला, भानुज्योती बिल्डिंग, एल एन रोड, माटुंगा मध्य रेल्वे स्टेशनसमोर घाटकोपर पूर्व : गणेश प्रिमियम टी पी एल, 103 नीलयोग स्क्वेअर, घाटकोपर रेल्वे स्टेशनसमोर वांद्रे, खार, सांताक्रूझ, माहिम सी लिकं : तिरुपती भवन, लिंकिंग रोड, अमरसन्सजवळ मस्जिद बंदर : महाजनवाडी चर्चगेट फोर्ट, सीएसटी : बालवीर सार्वजनिक गणेशोत्सव, डी एन रोड मालाड पश्चिम, अंधेरी पूर्, सांताक्रूझ पूर्व, मढ आयलंड : रक्षा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाणे : ए वन कॅटरर्स,रेल्वे हॉल, ठाणे स्टेशन जवळ
आणखी वाचा























