Mumbai Rains : मुंबईत आजपासून सलग पाच दिवस समुद्राला मोठी भरती, यंदा 19 दिवस दर्या खवळणार; तारखा पाहा एका क्लिकवर
Mumbai Rains : आजपासून दि. 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 19 वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे.

Mumbai Rains : मुंबईत मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला (Heavy Rain) सुरुवात झाली आहे. तर आज मंगळवारी (दि. 24) सकाळपासून मुंबईत (Mumbai News) ढगाळ वातावरण आहे. आजपासून दि. 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती (High tide at sea) येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात (Monsoon 2025) तब्बल 19 वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे. मोठ्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भरती दरम्यान साडेतीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. सर्वाधिक उंचीच्या लाटा या दिनांक 26 जून रोजी उसळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तर आज सव्वा अकरा वाजता भरतीची वेळ असून 4.59 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जावू नये, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे कळविण्यात आलेला मोठ्या भरतीचा तपशील खालीलप्रमाणे :
जून 2025
1. मंगळवार, दि. 24.06.2025 सकाळी – 11.15 वा. लाटांची उंची (मीटर्स) - 4.59
२. बुधवार, दि. 15.06.2025 दुपारी – 12.05 वा. लाटांची उंची (मीटर्स) - 4.71
३. गुरुवार, दि. 26.06.2025 दुपारी – 12.55 वा. लाटांची उंची (मीटर्स) - 4.75
४. शुक्रवार, दि. 27.06.2025 दुपारी – 01.40 वा. लाटांची उंची (मीटर्स) - 4.73
५. शनिवार, दि. 28.06.2025 दुपारी – 02.26 वा. लाटांची उंची (मीटर्स) - 4.64
जुलै 2025
1. गुरुवार, दि. 24.07.2025 – सकाळी 11:57 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.57
2. शुक्रवार, दि. 25.07.2025 – दुपारी 12:40 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.66
3. शनिवार, दि. 26.07.2025 – दुपारी 01:20 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.67
4. रविवार, दि. 27.07.2025 – दुपारी 01:56 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.60
ऑगस्ट 2025
1. रविवार, दि. 10.08.2025 – दुपारी 12:47 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.50
2. सोमवार, दि. 11.08.2025 – दुपारी 01:19 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.58
3. मंगळवार, दि. 12.08.2025 – दुपारी 01:52 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.58
4. शनिवार, दि. 23.08.2025 – दुपारी 12:16 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.54
5. रविवार, दि. 24.08.2025 – दुपारी 12:48 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.53
सप्टेंबर 2025
1. सोमवार, दि. 08.09.2025 – दुपारी 12:10 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.57
2. मंगळवार, दि. 09.09.2025 – दुपारी 12:41 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.63
3. बुधवार, दि. 10.09.2025 – मध्यरात्री 01:15 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.59
4. बुधवार, दि. 10.09.2025 – दुपारी 13:15 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.57
5. गुरुवार, दि. 11.09.2025 – मध्यरात्री 01:58 वा. – लाटांची उंची (मीटर) – 4.59
आणखी वाचा























