Mumbai Rain Update : पुढील 36 तासांत मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता, हवामान अभ्यासकांचा अंदाज
Mumbai Rain Update : पुढील 36 तासांत मुंबई आणि MMR भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Mumbai Rain Update) पडेल. जो पुढील 36-48 तासांत वाढेल.
![Mumbai Rain Update : पुढील 36 तासांत मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता, हवामान अभ्यासकांचा अंदाज Mumbai Rain Update Heavy to very heavy rain likely in Mumbai in next 36 hours, weather experts predict Marathi News Mumbai Rain Update : पुढील 36 तासांत मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता, हवामान अभ्यासकांचा अंदाज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/10/156e31dcb6999cef6e7cea2b8ceb4dd61720633232317924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Rain Update : पुढील 36 तासांत मुंबई आणि MMR भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Mumbai Rain Update) पडेल. जो पुढील 36-48 तासांत वाढेल. कारण शिअर झोन दूर होईल आणि या आठवड्याच्या शेवटी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी व्यक्त केलाय. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हा अंदाज व्यक्त केलाय.
सर्व परिस्थिती अनुकूल होण्यासाठी एक किंवा दोन दिवस लागतील
ऋषिकेश आग्रे म्हणाले, सध्याचे शिअर झोन दूर जात आहे, सर्व परिस्थिती अनुकूल होण्यासाठी एक किंवा दोन दिवस लागतील, जे सध्या या टप्प्यावर होत आहे. पश्चिमेकडील वारे योग्य आर्द्रतेसह संरेखित झाल्यानंतर, मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Rain Update) पडेल जो पुढील आठवड्यात देखील होईल.
आता पुन्हा मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज
मुंबईत मंगळवार दुपारपासून पावसाने (Mumbai Rain Update) उसंत घेतलेली पाहायला मिळाली. बुधवारीही पावसाने दडी मारली होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी 7.2 मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात 1.6 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, आता पुन्हा मुंबईत पावसाचा (Mumbai Rain Update) जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यात मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची (Mumbai Rain Update) शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, जुलैच्या सुरुवातीला मुंबईत जोरदार पाऊस (Mumbai Rain Update) झाला. कोकणातही पावसाचे प्रमाण अधिक होते. जोरदार सरी बरसल्याने धरणांमध्ये पाणीसाठा जमा होऊ शकला.
मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
कोकण वगळता इतर भागात सध्या पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र, पुढील चार दिवस मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची (Mumbai Rain Update) शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान, सध्या पावसाने (Mumbai Rain Update) उघडीप दिल्याने दुपारी मुंबईकरांनी उकाड्याला सामोरे जावे लागले. कोकण विभाग वगळता इतर भागात कमाल तापमानाचा पारा एक, दोन अंशानी चढा आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे सर्व साळांना सुट्ट्या देखील देण्यात आल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या
Manoj Jarange on Girish Mahajan : गिरीश महाजनांना वळवळ होती, जामनेरमध्ये 1 लाख 36 हजार कुणबी मराठे, नगराध्यक्ष म्हणाले, याचा टांगा पलटी करतो : मनोज जरांगे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)