एक्स्प्लोर

मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी; अनेक सखल भागांत पाणीच पाणी

मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला या भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत.

मुंबई : मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला या भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पहाटेपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. रविवारी रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. तर सोमवारी पहाटेपासून मुंबई उपनगरांतील विविध भागांत पावसाच्या सरी बसरत आहेत. गेल्या आठवड्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार आगमन केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

मुंबईतील दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, मालाड या भागांत सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. हिंदमाता परिसरातही मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आहे. पाणी साचल्यामुळे या भागांतील वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळची वेळ असल्यामुळे अनेकजण कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. अशातच गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तसेच पाणी साचल्यामुळे हिंदमाता उड्डाणपुलाखालचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाणी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून मॅनहोल्सही उघडे करण्यात आले आहेत.

दरम्यान, जुलै महिन्याच्या अखेपर्यंत राज्याच्या विविध भागांत पाऊस कायम राहणार आहे. प्रामुख्याने कोकण आणि विदर्भामध्ये पुढील तीन-चार दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची नोंद झाली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला
पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Banerjee: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
Video: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात अनधिकृत प्रवेश केला, महिलेची पोलिसांत फिर्याद
Gold : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा मोठा परिणाम! सोन्याची खरेदी 70 टक्क्यांनी घटली, 'जुने मोडून नवे' दागिने करण्याकडे कल
Shekhar Suman Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला
Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला, 'काॅकरोच'वरूनही तुफानी टोलेबाजी
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
Rishabh Pant : रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद सोडलं, LSG चा कॅप्टन कोण होणार? टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
रिषभ पंतनं आयपीएल संपण्यापूर्वी लखनौचं कर्णधार पद सोडलं, नवा कर्णधार कोण? भारताच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
RBI Repo Rate : आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
Embed widget