एक्स्प्लोर

मुंबईत पावसाची उसंत, रनवेची साफसफाई, उड्डाणं सुुरु

मुंबई विमानतळाच्या रनवेवर अडकलेलं स्पाईस जेटचं विमान काल रात्री बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर रनवे स्वच्छ करण्याचं काम पूर्ण झालं असून एअर इंडिया वगळता सर्व विमानांची उड्डाणं सुरु करण्यात आली आहेत.

मुंबई : मुंबईची उपनगरं, नवी मुंबई, ठाणे-कल्याण, वसई-विरार भागात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. काही भागात पावसाची रिमझिम सुरु आहे. मात्र येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. कोकण-गोव्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी पावसाचे असणार आहेत. विमान उड्डाणं सुरु मुंबई विमानतळाच्या रनवेवर अडकलेलं स्पाईस जेटचं विमान काल रात्री बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर रनवे स्वच्छ करण्याचं काम पूर्ण झालं असून एअर इंडिया वगळता सर्व विमानांची उड्डाणं सुरु करण्यात आली आहेत. एअर इंडियाची विमानसेवाही काही वेळेत सुरु करण्यात येणार आहे. मुंबईतील मोठ्या पावसामुळे एअरपोर्टवरचा रनवे चिखलानं माखला होता, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द करावी लागली होती. चक्रीवादळाच्या अफवांना बळी पडू नका दरम्यान, तुमच्या मोबाईलवर येणारे चक्रीवादळाचे मेसेज निव्वळ अफवा आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पत्र पालिका आयुक्त अजॉय मेहतांनी सहपोलिस आयुक्त देवेन भारती यांना लिहिलं आहे. सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत चक्रीवादळ होण्याच्या अफवांचा पाऊस पडला होता. मात्र चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्यानं फेटाळली आहे. राज्यात धरणं तुुडुंब मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणं तुडुंब झाली आहेत. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे दरवाजे आणखी अर्ध्या फुटाने उघडले आहेत. म्हणजे दोन फुटाच्या दरवाजातून 21 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Vardhapan din 2026: शिवसेनेचा आज वर्धापन दिन सोहळा, 'ऑपरेशन टायगर'च्या यशानंतर मुंबईतील मैदान कोण गाजवणार? ठाकरे-शिंदेंच्या मेळाव्यांकडे राज्याच्या नजरा
शिवसेनेचा आज वर्धापन दिन सोहळा, 'ऑपरेशन टायगर'च्या यशानंतर मुंबईतील मैदान कोण गाजवणार? ठाकरे-शिंदेंच्या मेळाव्यांकडे राज्याच्या नजरा
Chicken Shawarma Bhiwandi: भिवंडीत चिकन शोरमा खाल्ल्याने 14 जणांना विषबाधा, आरोग्य विभागाच्या तातडीने हालचाली, घटनास्थळी पथक पोहोचलं अन्...
भिवंडीत चिकन शोरमा खाल्ल्याने 14 जणांना विषबाधा, आरोग्य विभागाच्या तातडीने हालचाली, घटनास्थळी पथक पोहोचलं अन्...
Operation Tiger UBT Shivsena Nagesh Ashtikar Patil: नागेश आष्टीकरांचा मुलगा सुषमा अंधारेंवर संतापला, म्हणाला, 'तुमच्यासारख्या नेत्यांचा वीट...'
नागेश आष्टीकरांचा मुलगा सुषमा अंधारेंवर संतापला, म्हणाला, 'तुमच्यासारख्या नेत्यांचा वीट...'
Tukaram Mundhe Raid : तुकाराम मुंढेंच्या रडारवर आता मुंबईतील व्यापारी; 1,328 किलो भेसळयुक्त मिठाई, मावा जप्त
तुकाराम मुंढेंच्या रडारवर आता मुंबईतील व्यापारी; 1,328 किलो भेसळयुक्त मिठाई, मावा जप्त

व्हिडीओ

Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Accident News: इचलकरंजी एसटी डेपोत भीषण अपघात, कार गर्दीत घुसली, लोकांना चिरडलं, सहा जण जखमी
इचलकरंजी एसटी डेपोत भीषण अपघात, कार गर्दीत घुसली, लोकांना चिरडलं, सहा जण जखमी
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बेस्ट कर्मचारी जाणार संपावर, बससेवा आणि वीज विभागावर परिणाम होण्याची शक्यता
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बेस्ट कर्मचारी जाणार संपावर, बससेवा आणि वीज विभागावर परिणाम होण्याची शक्यता
Shivsena Operation Tiger LIVE: ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंना शिंदेंचा धक्का, आज दोन्ही सेनांच्या वर्धापन दिन सोहळ्यात काय घडणार?
Shivsena Operation Tiger LIVE: ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंना शिंदेंचा धक्का, आज दोन्ही सेनांच्या वर्धापन दिन सोहळ्यात काय घडणार?
Operation Tiger : खासदारांमागे ठाकरेंचे आमदारही येणारच आहेत, शिंदे साहेबांचं करेक्ट प्लॅनिंग; ऑपरेशन टायगरनंतर बड्या नेत्याचा दावा
खासदारांमागे ठाकरेंचे आमदारही येणारच आहेत, शिंदे साहेबांचं करेक्ट प्लॅनिंग; ऑपरेशन टायगरनंतर बड्या नेत्याचा दावा
Operation Tiger UBT Shivsena Nagesh Ashtikar Patil: नागेश आष्टीकरांचा मुलगा सुषमा अंधारेंवर संतापला, म्हणाला, 'तुमच्यासारख्या नेत्यांचा वीट...'
नागेश आष्टीकरांचा मुलगा सुषमा अंधारेंवर संतापला, म्हणाला, 'तुमच्यासारख्या नेत्यांचा वीट...'
Karnataka MLC Election: कर्नाटकात डीकेंचा मुख्यमंत्री होताच भाजपचा 'फंडा' भाजपला दाखवत सर्जिकल स्ट्राईक! मतांचा कोटा नसतानाही अनपेक्षित पाचवी जागा जिंकून दाखवली
कर्नाटकात डीकेंचा मुख्यमंत्री होताच भाजपचा 'फंडा' भाजपला दाखवत सर्जिकल स्ट्राईक! मतांचा कोटा नसतानाही अनपेक्षित पाचवी जागा जिंकून दाखवली
देशाच्या माजी पंतप्रधानांच्या माजी खासदार चिरंजीवांना सायबर भामट्यांचा तब्बल 7.8 कोटींचा गंडा! बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून धडाधड 30 ते 40 खात्यात पैसे ट्रान्सफर
देशाच्या माजी पंतप्रधानांच्या माजी खासदार चिरंजीवांना सायबर भामट्यांचा तब्बल 7.8 कोटींचा गंडा! बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून धडाधड 30 ते 40 खात्यात पैसे ट्रान्सफर
Rajya Sabha Election: इकडं मध्य प्रदेशात मीनाक्षी नटराजनांची उमेदवारी रद्द, तिकडं झारखंडमध्ये क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवाराचा पराभव; भाजप-समर्थित अपक्ष उद्योगपतीचा विजय
इकडं मध्य प्रदेशात मीनाक्षी नटराजनांची उमेदवारी रद्द, तिकडं झारखंडमध्ये क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवाराचा पराभव; भाजप-समर्थित अपक्ष उद्योगपतीचा विजय
Embed widget